Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ बनवणारी टोळी गजाआड…
पुणे(लोणावळा) प्रतिनिधी – लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असुन दोन-तीन दिवसांपासून लोणावळ्यातील विला वर हा सर्व गोरखधंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले येऊन पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १५ पैकी १३ जणांना अटक केली आहे. पॉर्न व्हिडिओ तयार करण्यास बंदी असतांना देखील लोणावळा येथे एक व्हीला भाड्याने घेत काही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पुणे ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केले आहे. या कारवाईत पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी अवैध धंदयांवर परीणामकारक कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन व निर्दालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये चोरून/छुप्यारीतीने अवैध व्यवसाय करणा-यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडुन पंकज देशमुख,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे,अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण व सत्यसाई कार्तीक, सहा.पोलिस अधीक्षक, तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये छुप्यारितीने अवैध व्यवसाय करणा-या अवैध व्यवसायिकांवर परीणामकारक कारवाई करण्यात येत आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.३०मार्च) रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम व महिला हे स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता मौजे पाटण गावचे हद्दीत बंगला भाडोत्री घेवुन त्यामध्ये पुरुष व स्त्रीया संभोग करताना / नम्न अश्लील चित्रीकरण करतात व सदरचे अश्लिल व्हिडीयोज विविध अवैध व अनधिकृतपणे बेबसाईट्सवर तसेच मोबाईल ॲप्लीकेशनवर अपलोड करून अश्लिल मजकूर ऑनलाईन प्रसारीत करतात. तसेच सदर अश्लिल (पॉर्न) व्हिडीयोज पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस घेऊन गैर मार्गाने लाखो रूपायांची कमाई करतात व सदरचे अश्लील (पॉर्न) व्हिडीओज Instagram, Twitter, Whatsapp इत्यादी सोशल मिडीया साईट्स व इंस्टट मेसेंजर यावरून प्रसारीत करतात व त्यातुन स्वतःचा अर्थिक फायदा करून घेतात.
त्याप्रमाणे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण व सत्यसाई कार्तीक, सहा.पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोउपनि भारत भोसले, सागर अस्गडे, सफौ निरीक्षक अजय दरेकर,महेन्द्र वाळुंजकर, बनसोडे, पो.हवा. दुर्गा जाधव, भोईर, म.पो. हवा. घुगे, म.नापोशि कोहीनकर,पोशि धनवे, सुरज गायकवाड यांच्या पथकाने नमुद प्राप्त माहितीच्या ठिकाणी (दि.२९मार्च) रोजी ५.०० वा.सू. छापा टाकला असता मौजे पाटण गावचे हद्दीमध्ये आर्णव व्हिला, ता.मावळ, जि. पुणे येथे १३ पुरुष व ५ महिला हे देशामध्ये अश्लिल व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःचे आर्थिक फायदा करण्याचे उद्देशाने सर्वांनी संगणमत करून सोबतच्या दोन कॅमेरां किं.रूपये ६७२६२०/- असा विविध अवैध वेबसाईट्स व मोबाईल ॲप्लीकेशनवर अपलोड करून प्रसारीत व प्रचारीत करण्याची व्यवस्था करून स्वतः नमुद पुरुष इसम व स्वतः नमुद स्त्रीयां संभोग करतानाचे तसेच अश्लिल, नग्न व विभीस्त चित्रीकरण करून वेगवेगळ्या अश्लिल, नम्न व विभीस्त चित्रफिती तयार करत असताना मिळून आले. तसेच मळवली येथील तीन स्थानिक आरोपी इसम यांनी स्वतःचे आर्थिक फायदया करीता ते भाडोत्री चालवत असलेला आर्णव व्हिला हा नमुदचे पुरुष व स्त्रीया यांचे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे न घेता आर्णव व्हिलामध्ये स्वतः पुरुष व सोबतच्या महिलांचे संभोग करतानाचे तसेच अश्लिल व नग्न चित्रीकरण करून वेगवेगळ्या अश्लिल, नम्न व विभीस्त चित्रफिती तयार करत असल्याचे माहिती असताना देखील त्याबाबत पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नमुदचा बंगला अश्लिल, नग्न व विभीस्त व्हिडीयो तयार करण्याकरीता ३००००/- हजार रूपयांना ठरवून २००००/- रूपये ॲडव्हान्स घेवुन भाडोत्री दिला असल्याचे आढळून आल्याने नमुद इसमांचे विरुध्द पो.उपनि भास्त भोसले, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन ती गु.र.नं. ११४/२०२४, भा.द.वि.क. २९२, २९३. ३४. माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७, ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३,४,६,७ प्रमाणे दाखल करण्यात आली असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास वरीष्ठांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.
अश्लिल चित्रफित तयार करणारे आरोपी व महिला आरोपीची नावे –
१) विष्णु मुन्नासाहब साओ (वय-३० वर्षे), रा.१६/ तारचद बानर्जींगड, कामरहटी, नॉर्थ २४, परगना, कोलकत्ता, २) जावेद हबीबुल्ला खान (वय-३५ वर्ष), रा. आहरा उमरी, पोस्ट मुंडेस्या, जि.बस्ती, उत्तरप्रदेश, ३) बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास )वय-२९ वर्षे), रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर, ४) समीर मेहताब आलम (वय-२६ वर्षे), रा. अमरोहा, गईड मॉक्सी, मस्जीद जवळ, उत्तरप्रदेश, ५) अनुप मिथीलेश चौबे (वय-२९ वर्षे), रा.मम नं २, काशीबाईचाळ, इव्हर स्टॅण्ड, कांदिवली ईस्ट, मुंबई, ६) रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१ वर्षे), रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा, ७) राहुल सुरेश नेवरेकर (वय-३८ वर्षे), रा.रूम. नं १०, मोहनचाल, नितीन कंपनी समोर, संभाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे, ८) अनिकेत पवन शर्मा (वय-१९ वर्षे), व्यवसाय-मेकअप आर्टीस्ट, रा. रुद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात,९) वंशज सीन वर्मा (वय-२१ वर्षे), रा.टी.एच.डी.सी. कॉलनी, डेहगखास, डेहराडून, १०) मनीष हिरामण चौधरी (वय-२० वर्षे), रा. रोनक इराभाई, शास्त्रीनगर, हरीयाणा व ५ महिला आरोपी
अश्लिल चित्रफित चित्रीकरणाकरीता बंगला भाडोत्री देणा-या आरोपींची नावे –
१) सुखदेव चांगदेव जाधव (वय-५२ वर्षे), रा.मळवली, ता. मावळ, जि. पुणे, २) आकेश गौतम शिंदे वय ३२ वर्षे, रा. मळवली, ता. मावळ, जि.पुणे ३) सनी विलास शेडगे (वय-३५ वर्षे), रा. मळवली, ता.मावळ, जि. पुणे या सर्वांना अटक करून यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी लोणावळा सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पोउपनि भारत भोसले, सागर अरगडे, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन, अजय दरेकर, सफौ महेंद्र वाळुंजकर, भोईर, महीला नापोशि दुर्गा जाधव, पुष्पा घुगे, पो.हवा. रूपाली कोहीनकर, म.पो.ना. कोहीनकर सागर धनवे, पोलीस अंमलदार,सुरज गायकवाड, यांनी केली आहे.