Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गौणखनिजाची वाळुची अवैधरित्या चोरी करुन साठवणुक करणाऱ्यावर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा छापा….

11

जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी दिली अवैधरित्या रेती उपसा सुरु असलेल्या रेती घाटावर धडक,टिप्पर, हायवा पोकलँड मशिन, इंजिन बोट व जेसीबीसह दोन कोटी पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त २१ आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,दि (२९) रोजी मध्यरात्री चे  दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीतील मौजा टाकळी (चना) येथील सोनेगाव बाई रेती डेपोच्या नावावर गौण खनिज (रेती) चा अवैध रेती उपसा सुरु असल्याच्या माहितीवरुन मा. जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी स्वतः त्यांचे नेतृत्वात उपविभागीय दंडाधिकारी, वर्धा, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव, तहसिलदार देवळी, ठाणेदार देवळी तसेच पोलिस अधीक्षक वर्धा यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह अवैधरित्या गौण खनिजाचा उपसा सुरु असलेल्या रेती घाटावर छापा टाकला असता केली सदर ठिकाणी रात्रीचे वेळी नियमबाहय पध्दतीने अवैधरित्या इंजिन बोट, पोकलैंड मशिन व जेसिबीच्या सहायाने गौण खनिज (रेती) चा उपसा सुरु असल्याचे आढळून आले तसेच उपसा केलेल्या रेतीची अवैधरित्या वाहतुक करण्यासाठी टिप्पर व हायवा ट्रक मध्ये रेती भरलेली मिळुन आली. मौजा टाकळी (चना) येथील सोनेगाव बाई डेपो क्रमांक ३ हा गुरुकृपा फ्लाय अॅश कंपनी प्रा लिमी प्रकाश पांडुरंग सुरकार, रा. राधाकृपा चौक, रानडे प्लॉट, रामनगर, वर्धा याचे नावे असून त्यांनी सदर ठिकाणी नियमबाहय गौण खनिजाचे उत्खणन करुन ती डेपोमध्ये जमा न करता परस्पर चोरटी वाहतुक करुन शासनाची फसवणुक करीत महसुल कागदपत्रात फेरफार करुन शासनाचा महसूल चुकवून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता रेतीची चोरी करीत असल्याचे आढळूण आल्याने सदर ठिकाणी मिळुन आलेले १)रेतीने भरुन असलेले ४ टिप्पर, २) रेतीने भरुन असलेला एक हायवा ट्रक, ३) दोन ट्रक्टर, ४) एक जेसिवी मशिन, ५) एक पोकलैंड मशिन, ६) एक इंजिन बोट, ७) रेती विक्रीचे नगदी ४९,८००/- रुपये, ८) ११ मोबाईल हँडसेट असा एकुण २,१५,११,८००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी नामे १) प्रकाश पांडुरंग सुरकार, रा. रामनगर, वर्धा, २) संतोष नवरंगे, रा. कारला चौक, वर्धा, ३) सचिन गोविंदराव पाल, रा. शिरसमुद्रपूर, ता. सेलू, ४) नरेंद्र नवनाखे, रा. कारला चौक, वर्धा, ५) बाबाराव चोखोवाजी कांबळे, रा. बोरगाव मेघे, वर्धा, ६) अमर काळे, रा. सिंदी मेघे, वर्धा, ७)अशोक दामाजी कुरसंगे, रा. इंदिरा नगर, वर्धा, ८) रविंद्र दिपक लव्हाळे, रा. खरांगणा गोडे, ९) अभिषेक ढवळे, रा. आर्वी नाका,वर्धा, १०) राहुल साटोणे, रा. वर्धा, ११) जयेंद्र जगदिश तकोडीया, रा. शिवणी, छपरा (म.प्र.), १२) रवि महादेव आत्राम, रा. राळेगाव, जि. यवतमाळ, १३ ) विनोद भोकरे, रा. राळेगाव लोणी, जि. यवतमाळ, १४) विहेंद्र सावनाहार तकोडीया, रा. शिवणी, छपरा (म.प्र.),१५) योगेश, रा. मोहदा, ता. राळेगाव, जि. यवतमाळ, १६) दिपक बिलसू उईके, रा. शिवणी, छपरा (म.प्र.), १७) शैलेश प्रभाकर डोनालकर, रा शिरसगाव धनाडे, जि. वर्धा, १८) राहुल तुळशिराम वाघमारे, रा. पारडी चाकुर, जि. वर्धा, १९) सत्येंद्र अनिललाल इनवाती, रा. सुराडोंगरी, ता. धाणोरा, जि. शिवणी, (म.प्र.), २०) विजय अरुन डवरे, रा. आर्वी नाका, वर्धा, २१) टिप्पर क्रमांक एमएच-३१/सीबी- ९७७१ चा चालक (फरार) यांचे विरुध्द पोलिस स्टेशन, देवळी येथे भादंविचे कलम ३७९, ४२०, ४६७, ४७१,१२० (ब) सहकलम ४८ (ब) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ सहकलम ३ (१), १८१, १३०, १७७ मोवाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी जिल्हाधिकारी, वर्धा राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक, वर्धा  नूरुल हसन यांचे नेतृत्वात,उपविभागीय अधिकारी, वर्धा दिपक करंडे, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव राहुल चव्हाण, तहसिलदार देवळी दत्ता जाधव, ठाणेदार पोलिस स्टेशन, देवळी सार्थक नेहते, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, पोलिस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलाश वालदे, प्रदिप कुचनकर, संदिप गावंडे, सुगम चौधरी, शुभम बहादुरे तसेच पोलीस स्टेशन, देवळी व पो.मु. वर्धा येथील अंमलदार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.