Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुम्ही कोणते व्हिडीओ पाहता याची Facebook ठेवतं नोंद; अशाप्रकारे डिलीट करा वॉच हिस्ट्री

7

Facebook वर सध्या जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. यात चॅटिंग पासून ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग देखील करता येते. या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ देखील पाहता येतात, सोबत सर्च करण्याची सुविधा देखील मिळते. म्हणजे युजर्स आपल्या आवडीचा व्हिडीओ सर्च करून देखील पाहू शकतात. यामुळे अ‍ॅप मध्ये वॉच हिस्ट्री तयार होते. विशेष म्हणजे ही डिलीट देखील करता येते. जर तुम्ही फेसबुकवरील वॉच हिस्ट्री डिलीट करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये महत्वाची माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला इथे सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हिस्ट्री डिलीट करू शकाल.

Android आणि iPhone युजर्स अश्याप्रकारे डिलीट करू शकतात हिस्ट्री

Android आणि iPhone मध्ये Facebook वॉच हिस्ट्री डिलीट करण्याची प्रोसेस सारखी आहे. चला पुढे जाणून घेऊया स्टेप्स

  1. तुमच्या डिव्हाइसमध्ये फेसबुक ओपन करा.
  2. थ्री लाइन ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या प्रोफाईल मध्ये जा..
  3. खालच्या बाजूला स्क्रोल करा.
  4. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये जाऊन सेटिंग निवडा.
  5. युअर फेसबुक इंफोरमेशनमध्ये जाकर अ‍ॅक्टिव्हिटी लॉग वर क्लिक करा.
  6. Videos You’ve Watched वर क्लिक करा.
  7. इथे तुम्हाला ते व्हिडीओ दिसतील, जे तुम्ही पहिले आहेत. एक-एक करून किंवा एकदा सर्व व्हिडीओ डिलीट करू शकता.

Windows आणि Mac युजर्स हिस्ट्री अशी करा डिलीट

  1. तुमच्या कंप्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये फेसबुक ओपन करा.
  2. तुमचा युजर आयडी टाकून लॉग-इन करा.
  3. तुमच्या प्रोफाईल मध्ये जा.
  4. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये जाऊन सेटिंगवर टॅप करा.
  5. इथे तुम्हाला Your Facebook Information सेक्शन मिळेल, ज्यात जाऊन Activity Log वर क्लिक करा.
  6. त्यानंतर Videos You’ve Watched वर टॅप करा.
  7. इथे तुम्हाला तुम्ही पाहिलेले व्हिडीओ दिसतील.
  8. इथून तुम्ही Clear All करून एकदा संपूर्ण हिस्ट्री डिलीट करू शकता किंवा एक-एक करून व्हिडीओ डिलीट करू शकता.

Live Video वॉच हिस्ट्री देखील करता येईल डिलीट

फेसबुकवर वॉच हिस्ट्री व्यतिरिक्त लाइव्ह व्हिडीओ वॉच हिस्ट्री देखील डिलीट केली जाऊ शकते. ही डिलीट करण्याची प्रोसेस वर सांगितलेल्या वॉच हिस्ट्री डिलीट करण्यासारखी आहे. या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही कोणताही लाइव्ह सेशन डिलीट करू शकता, जो तुम्ही पाहिला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.