Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे प्रयत्नांना यश – अखेर कळंब येथील बारचा परवाना तात्पुरता निलंबित.….
आमची बातमी १००% खरी ठरली..,.
खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…
वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही जिल्ह्यालगतच्या बारमधून तसेच वाईन शॉपीमधून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु होती. याची दखल घेऊन पोलिसकाका क्राईमबिट न्यूज ने ‘खबरदार! वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द’ या मथळ्यावर बातमी प्रकाशित केली,पोलिस अधिक्षकांनी आधीच जलदगतीने सूत्र फिरवून कारवाईची मोहिम हाती घेतली होती.
पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बारचा परवाना रद्द करण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. अखेर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रस्तावाची दखल घेत कळंब येथील अवैधरित्या दारूची विक्री,पुरवठा करणारा एम.पी. ट्रेडर्स वाईन बारचा मालक मनिष सुरेश जयस्वाल रा.यवतमाळ याचा बार परवाना दि.४ जून पर्यंत निलंबित (रद्द) करण्याचे आदेश पारित केले. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी थेट जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या म्होरक्यांवरच कारवाईची टाच उगारल्याने दारुपुरवठा करणारे तसेच विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनुज्ञप्तीधारक दारूविक्रेता मनिष सुरेश जयस्वाल रा. साईसहवासनगर, यवतमाळ जिल्हा यवतमाळ याने वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याचे माहित असतांना सुद्धा हेतूपुरस्सर आपला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने दारूचा अवैधरित्या मोठया प्रमाणावर पुरवठा केला. सदरचा एम.पी. ट्रेडर्स वाईन बार कळंब हा वर्धा जिल्हयाचे सिमेच्याजवळच असून तेथुन देशी/विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणे शक्य असल्याने भविष्यात सुद्धा सदर एम.पी. ट्रेडर्स वाईन बार कळंब मधुन मोठ्या प्रमाणात विदेशी/देशी दारूचा साठा वर्धा जिल्हयात येण्याची दाट शक्यता असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर त्याचे एम.पी. ट्रेडर्स वाईन बारचा अनुज्ञप्ती/परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना सादर करण्यात आला होता.
सदर अनुज्ञप्तीधारक मनिष सुरेश जयस्वाल रा. साईसहवासनगर, यवतमाळ जिल्हा यवतमाळ याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विदेशी दारूची ठोक स्वरूपात विक्री केल्यामुळे अनुज्ञप्तीमधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी सदर प्रस्तावाचे अनुषंगाने कठोर कायदेशिर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे तरतुदीनुसार एम.पी. ट्रेडर्स वाईन बारची अनुज्ञप्ती (दि.०४जून २०२४) पर्यंत निलंबित करण्याचे आदेश पारीत केले.
सदर कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक, डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे सफौ.गिरीश कोरडे यांनी केली आहे.