Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उसने पैसे देण्याचा बहाणा करुन अपघाताचा बनाव करुन जिवे ठार मारलेल्या आरोपींतांना १२ तासाच्या आत अटक करुन,खुनाचा गुन्हा केला उघड….,
भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ३१/०१/२०२४ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास पळासखेडा ता. भडगाव ते तरवाडे ता.पारोळा गावाच्या दरम्यान असलेल्या रोडावर भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत एस इसम हा मयत स्थितीत पडलेला असल्याबाबत पोलिस पाटील पळासखेडा ता. भडगाव यांना समजुन आल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर इसम हा पळासखेडा ता.भडगाव गावातील किशोर शिवाजी पाटील वय ४५ हा असल्याचे समजुन आले. सदर मयत इसम किशोर शिवाजी पाटील हा म्रुत स्थितीत मिळुन आला तेव्हा त्याचे चेहऱ्यावर, डोक्यास व तोंडास मार लागलेला होता. त्यावरुन पोलिस पाटील ज्ञानेश्वर गोरख मोरे यांनी पोलिस स्टेशनला लेखी माहीती दिल्याने भडगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मुत्यु रजिस्टर नं.१९/२०२४ CRPC १७४ प्रमाणे दिनांक ३१/०३/२०२४ रोजी सकाळी ०८.३४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अकस्मात मुत्युचा तपास हा सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्याकडे देण्यात आलेला होता.
सदर घटनेतील म्रुतक याचे प्रेताची बारकाईने पाहणी करता पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना घातपात झाल्याचा संशय आल्याने पोलिस अधिक्षक माहेश्वर रेड्डी,.अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलिस अधिक्षक अभयसिह देशमुख,चाळीसगांव यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास करुन सदर तपासात यातील म्रुतक
किशोर पाटील याचे वडील शिवाजी पाटील यांना विचारपुस करता त्यांचे कडुन माहिती मिळाली की, म्रुतक किशोर याची पत्नी व किशोर यांच्यात पैशाच्या देण्यावरुन वादावादी होत होती. यावरुन सदर मु्तकाचा खुन झाला असल्याचे निष्पन्न करुन त्यांची रितसर फिर्याद नोंदवुन भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं.१०४/२०२४ भादवी.क.३०२, २०१,३४ प्रमाणे दिनांक ३१/०३/२०२४ रोजी १६.५९ वाजता दाखल करण्यात आला. यातील म्रुतकाची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला
विचारपुस करता तिने सांगीतले की, आळंदी येथील माझ्या ओळखीचे राजेंद्र शेळके महाराज हे माझ्या पतीला ऊसनवारीने लोकांचे देणे देण्यासाठी पैसे देणार आहे. असा बहाणा करुन राजेंद्र शेळके यांने माझ्या पतीला तो मला त्रास देत असल्याने त्याचे गाडीत घालुन नेऊन अपघाताचा बनाव करुन ठार केले आहे असे सांगीतले. यावरुन यातील मयताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला ताब्यात घेवुन तांत्रीक पुराव्याचा आधारे यातील आरोपी नामे राजेंद्र गंगाधर शेळके रा.खेड आळंदी पुणे यास ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली चार चाकी गाडी क्रमांक MH १२ FS ००१० मारोती सियाज पांढऱ्या रंगाची हि जप्त करण्यात
आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांना १२ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी.पोलिस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर,पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ संजय काळे,रमण कंडारे,.राजेंद्र पाटील चालक,अनिल रामचंद्र अहिरे, पोहवा निलेश ब्राम्हणकार,पोशि भुषण शेलार, भुषण मोरे,संदिप
सोनवणे, संभाजी पाटील (चालक) यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख करीत आहेत.