Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विविध आकर्षक डिस्काउंटस
फोनची किंमत सध्या 19,499 रुपये आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ‘सॅमसंग ॲक्सिस बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड’द्वारे पैसे भरल्यास, तुम्हाला 2500 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. त्याचप्रमाणे, जर तुमच्याकडे ‘Samsung Axis Bank Infinite’ कार्ड असेल, तर तुम्हाला हा फोन 5,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटवर सेलमध्ये मिळू शकेल.’SBI बँक कार्ड’द्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सना 1500 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही ‘Flipkart Axis Bank’ कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 16,500 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची कंडिशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. 686 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील तुम्ही फोन घेऊ शकता. फ्लिपकार्टची ही धमाकेदार विक्री 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- कंपनीचा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोअरेज ऑप्शनमध्ये येतो.
- प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये ‘MediaTek Dimension 6100+’ चिपसेट पाहायला मिळेल.
- या सॅमसंग फोनमध्ये 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे.
- एचडी+ डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, हा डिस्प्ले 800 nits ची हायएस्ट ब्राइटनेस लेव्हल ऑफर करतो.
- फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 5-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे.
- त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
- साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो. ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.