Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आता एका मीडिया रिपोर्टनुसार क्रोमच्या इनकॉग्निटो मोडमधून गोळा केलेला डेटा गुगल डिलीट करणार आहे. याआधी कंपनीनं क्रोम मधील इनकॉग्निटो मोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये बदल करून युजर्सना याची माहिती देण्यास सुरुवात देखील केली आहे.
क्रोम इनकॉग्निटो मोडमधील डेटा
क्रोममधील इनकॉग्निटो मोड मधील ब्राउजिंग हिस्ट्री, कुकीज किंवा इतर कोणतीही माहिती युजरच्या लोकल फोन किंवा कंप्यूटरवर साठवली जात नाही. त्यामुळे जेव्हा कोणतेही पुरावे मागे न ठेवता वेब ब्राउजिंग करायचं असतं तेव्हा युजर्स या मोडचा वापर करतात.
परंतु इनकॉग्निटो मोडमधील डेटा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि वेबसाइटला सहज दिसतो, परंतु अनेक युजर्सना वाटत होते की गुगल ब्राउजिंग डेटाचा रेकॉर्ड ठेवत नाही कारण या मोडचा फोकस प्रायव्हसीवर जास्त आहे.
परंतु २०२० मध्ये ५ बिलियन डॉलर्सचा खटला दाखल करण्यात आला आणि कंपनी इनकॉग्निटो मोडमध्ये देखील युजर्सना ट्रॅक करते असा आरोप करण्यात आला. केस फुल ट्रायलला घेऊन जाण्याऐवजी कंपनीनं प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतली आहे, गुगलनं याबाबत कोणतंही कारण दिलं नाही.
तसेच गुगलनं गुपचूप आपल्या इनकॉग्निटो मोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये बदल केला आहे, जो डेस्कटॉप क्रोमच्या काही व्हर्जनमध्ये दिसत आहे. यात गुगल इनकॉग्निटो मोडमध्ये काही माहिती गोळा करतं असा उल्लेख आता टाकण्यात आला आहे. हे नवीन डिस्क्रिप्शन सर्वच युजर्सना रोल आऊट करण्यात आलं नाही, परंतु यातून कंपनीनं नकळत आरोप कबूल केला असं म्हणता येईल.
डेटा डिलीट करणार
सेटलमेंटच्या अटींनुसार, गुगलनं याआधी इनकॉग्निटो मोड मध्ये गोळा केलेला युजर्सचा डेटा डिलीट करण्यास संमती दर्शवली आहे. परंतु हे कधीपर्यंत होईल हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही. तसेच कंपनीनं प्रायव्हेट ब्राउजिंगमधून डेटा गोळा करणं बंद करेल की नाही हे स्पष्ट केलं नाही. इनकॉग्निटो मोड मधील डिस्क्रिप्शन मधील बदल मात्र हेच सुचवतो की कंपनी डेटा गोळा करणं सुरु ठेवेल परंतु यावेळी युजर्सना पूर्व सूचना मिळेल.