Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OnePlus Nord CE 4 ची किंमत
वनप्लस नॉर्ड सीई४ ५जी फोन भारतीय बाजारात ८जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. याच्या १२८जीबी व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. तसेच Nord CE 4 चा मोठा २५६जीबी मॉडेल २६,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मोबाइल Dark Chrome आणि Celadon Marble कलरमध्ये मिळेल.
OnePlus Nord CE 4 वरील ऑफर्स
नॉर्ड सीई ४ ५जी फोनसह कंपनी २,१९९ रुपयांचे OnePlus Nord Buds 2r मोफत दिले जात आहेत. वनप्लस स्मार्टफोन युजर्सना ३ महिन्याची Extended Warranty आणि ४ महिन्याचे Spotify Premium free मिळेल. तसेच OnePlus Nord CE 4 Protection Package वर ९० टक्क्यांपर्यंतची सूट देखील मिळेल.
HDFC बँक डेबिट कार्डवर १५०० रुपयांची, तर Credit Card EMI वर १२५० रुपयांची सूट मिळत आहे. तर ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रँजॅक्शनवर १५०० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. OneCard वर कंपनी १५०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. हा फोन ६ महिन्यांच्या No-Cost EMI सह खरेदी करता येईल.
OnePlus Nord CE 4 चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस नॉर्ड सीई४ ५जी फोन २४१२ × १०८० पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या ६.७ इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन फ्लूइड अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करते.
वनप्लस फोन अँड्रॉइड १४ वर लाँच झाला आहे जो ऑक्सीजन ओएस १४ वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो २.६३गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
OnePlus Nord CE4 5G फोन ८जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये ८जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी फिजिकल रॅमसह मिळून १६जीबी रॅमची ताकद देते. नॉर्ड सीई४ मध्ये १२८जीबी व २५६जीबी स्टोरेज मिळते जी १टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी नॉर्ड सीई४ ५जी फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी६०० मेन सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड आयएमएक्स३५५ लेन्स आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड सीई४ ५,५००एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी मोबाइलमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त २९ मिनिटांत १% ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. OnePlus Nord CE4 5G फोन IP54 रेटेड आहे. यात USB Type-C 2.0, Bluetooth 5.4 आणि 5GHz dual-band Wi-Fi सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.