Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तुमच्या मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा ठेवा इतरांच्या नजरांपासून दूर, Android स्मार्टफोनमध्ये अनेबल करा गेस्ट मोड
तुमच्या मोबाईलमध्ये गेस्ट मोड ऍक्टीवेट केल्यास तुमच्या डेटाला चांगली सिक्युरीटी मिळणार आहे. तुमचा खाजगी डेटा इतरांच्या नजरांपासून वाचवण्यासाठी हा मोड कामी येणार आहे. अनेकदा काही कामनिमित्त फोन इतर व्यक्तींच्या हाती द्यावा लागतो. असे केल्यास जर तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी कुणाला दाखवू इच्छित नसाल तर गेस्ट मोड तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. गेस्ट मोडचा वापर करुन तुम्ही तुमचे प्रायव्हेट फोटोज,व्हीडीओज आणि डेटा इतरांपासून लपवू शकतात.
गेस्ट मोड कसे काम करतो?
अँड्रॉइड फोनमध्ये गेस्ट मोड हे एक खास फिचर आहे. याचा वापर करुन तुम्ही तुमचा मोबाईल काही काळासाठी इतरांच्या ताब्यात देऊ शकतात. हा मोड ऍक्टिवेट केल्यामुळे साबंधित व्यक्ती फोनवरील फाइल्स किंवा मेसेजेस पाहू शकणार नाही. यावेळी तुमचे वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्शन पूर्वीसारखीच काम करणार आहे. हा मोड सुरू केल्यास तुम्हाला एक उत्तम सुरक्षेची हमी मिळणार आहे.
गेस्ट मोडचा वापर कसा करावा
१. सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्ज ओपन करा.
२. नंतर स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि ‘यूजर’ आणि अकाऊंटचा” ऑप्शन सर्च करा, काही मोबाईल्समध्ये तुम्हाला थेट गेस्ट मोडचा ऑप्शन बघायला मिळेल.
३. तुम्हाला वरील सर्च बारमध्ये “गेस्ट मोड” असे लिहून देखील शोधता येईल
४. यानंतर तुम्हाला ” Allow Multiple Users” सुरू करावे लागेल.
५. हे सुरु केल्यानंतर, तुमच्या फोनमध्ये दोन वेगळ्या यूजर प्रोफाइल तयार होतील.
६. यानंतर “Add User” ऑप्शनवर क्लिक करा.
७. आता तयार केलेल्या नवीन प्रोफाइलवर टॅप करा. तुम्हाला हवे असल्यास प्रोफाईल स्विच करता येईल
८. गेस्ट मोडमध्ये असतांना स्मार्टफोनचा वापर झाल्यानंतर , तुमच्या प्रोफाइलवर परत येण्यासाठी त्याच पद्धतीचे प्रोफाइलवर परत या. तसेच गेस्ट तुमच्या फोनवरून कॉल किंवा मेसेज करू शकता की नाही हे देखील तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे.