Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१३ हजारांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 15! अशी आहे ऑफर

10

iPhone विकत घेणे अनेकांचे स्वप्न आहे परंतु किंमत जास्त असल्यामुळे Apple Mobile खरेदी करता येत नाही. अ‍ॅप्पलचा सर्वात लेटेस्ट मॉडेल आयफोन १५ ७९,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला होता परंतु सध्या हा ६६,६९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही देखील स्वस्तात iPhone 15 खरेदी करू इच्छित असाल तर पुढे आम्ही एका चांगल्या ऑफरची माहिती दिली आहे ज्यामुळे आयफोन १५ वर जबरदस्त डिस्काउंट मिळवता येईल.

iPhone 15 वर डिस्काउंट

आयफोन १५ वर ६,००० रुपयांचा डिस्काउंट ICICI Bank देत आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डने आयफोन १५ खरेदी केल्यास सहा हजारांची सूट मिळेल.ही ऑफर ई-कॉमर्स साइट amazon.in वर उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवर iPhone 15 सध्या ७२,६९० रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. म्हणजे आयफोन १५ च्या लाँच प्राइस ७९,९९९ रुपये रूपयांवर ७३०९ रूपयांची सुट आहे.

ICICI Credit Card ने खरेदी केल्यास ६,००० रुपये आणखी कमी होतील, त्यामुळे किंमत ६६,६९० रुपये होईल. म्हणजे अ‍ॅमेझॉनवर ७९९९९ रुपयांच्या iPhone 15 १३३०९ रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. ICICI प्रमाणेच SBI Credit Card वर देखील ६००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही promo code ची आवश्यकता नाही.

iPhone 15 Specifications

आयफोन १५ कंपनीनं १९.५:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर केला आहे. ज्यात ११७९ x २५५६ पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.१ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. अ‍ॅप्पलनं यात एक्सडीआर ओएलईडी पॅनलचा वापर केला आहे, ज्याला सुपर रेटिना नाव देण्यात आलं आहे. यात देखील २,०००निट्स ब्राइटनेस तसेच एचडीआर१० सारखे फीचर्स मिळतात.

iPhone 15 अ‍ॅप्पल च्या लेटेस्ट आपरेटिंग सिस्टम आयओएस १७ सह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी यात ए१६ बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे जो ४नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनला आहे. या फोनचा प्रोसेसर ३.४६गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. iPhone 15 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या मोबाइलच्या रियर मॉड्यूलमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच १२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर १२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.

iPhone 15 पावर बॅकअपसाठी ३,३४९एमएएच बॅटरी आहे. हा मोबाइल फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तसेच वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. कंपनीनं यात २७वॉट वायर्ड तसेच १८वॉट वायरलेस चार्जिंग दिली आहे. सिक्योरिटीसाठी Face ID सपोर्ट तर धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून IP68 रेटिंग मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी USB Type-C 2.0 आणि Wi-Fi 6 सारखे ऑप्शन मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.