Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वारंवार फोन उघडण्याच्या आणि इन्स्टाग्राम चेक करण्याच्या सवयीने त्रासलेल्यांच्या समस्येवर उपाय; इन्स्ट्राग्रामचे ‘हे’ खास फीचर करेल काम
इंस्टाग्राम त्रास देते
इन्स्टाग्राममुळे तुम्हाला इतर कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते का? तुम्हालाही इन्स्टाग्राम वारंवार उघडण्याची, तपासण्याची आणि वापरण्याची सवय आहे का? या प्रश्नांची उत्तरे होय असल्यास, या प्लॅटफॉर्मवरील क्वाईट मोड फक्त तुमच्यासाठी बनवला आहे असे समजा.
इन्स्टाग्राम क्वाईट मोड काय आहे
सर्वप्रथम आपण इंस्टाग्रामवर Quiet Mode म्हणजे काय ते समजून घेऊ. वास्तविक, या विशेष फीचरसह, Instagram युजर्स ॲपद्वारे विचलित न होता इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.या मोडसह इंस्टाग्राम नोटीफिकेशन म्यूट होऊन जातात. इतकेच नाही तर युजरचे स्टेटस आणि ऑटो रिप्लाय देखील या क्वाईट मोडमध्ये अपडेट होतो.रात्री किंवा इतर कोणतेही काम करताना हा मोड चालू करता येतो. चांगली गोष्ट म्हणजे फीचर चालू होण्याच्या 10 मिनिटे आधी यूजरला रिमाइंडर मिळतो.
तुमच्या फोनवर कसा कराल Instagram क्वाईट मोड ॲक्टिव्ह
- सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करावे लागेल.
- आता तुम्हाला तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करावे लागेल.
- आता तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनू आयकॉनवर टॅप करावे लागेल.
- आता तुम्हाला मेनूमधून नोटिफिकेशन वर टॅप करावे लागेल.
- आता तुम्हाला क्वाईट मोडवर टॅप करावे लागेल.
- आता या मोडच्या पुढील टॉगल एबल आणि डिसेबल केले जाऊ शकते.
- आता तुम्हाला क्वाईट मोडसाठी स्टार्ट आणि एन्ड वेळ सेट करावी लागेल.
- तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही सेटिंग वापरू शकता.
वास्तविक, क्वाईट मोड आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी ॲक्टिव्ह आहे. आपल्या सोयीनुसार ते डिसेबल आणि मॅनेज केले जाऊ शकते.