Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Gudi Padwa 2024 : नव चैतन्याचा सोहळा गुढी पाडवा….प्रियजनांना द्या, गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छ !! ठेवा स्टेटस

11
यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. सगळेजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असतील. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून, या दिवशी आपण आपल्या नातलगांना, मित्र मैत्रिणींना, आप्तस्वकीयांना नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यासाठी या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

नव वर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे

पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आज माझ्या मनी आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !

गुढी पाडवा संदेश व्हॉट्सअपसाठी

आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुढीपाडवा.

नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ.

आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन.

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.

गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स

एक ताजेपणा, एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या शुभेच्छा.

उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण

चला पुन्हा घेऊन नवी उमेद साजरं करू हे नवं वर्ष.

वर्षामागून वर्ष जाती, नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…नववर्षाभिनंदन.

नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन.

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !”

जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुढीपाडवा

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.