Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोटोरोलानं लाँच केला बजेट फ्रेंडली Moto G40s; नव्या ऑपरेटिंग सिस्टमसह वॉटर रिपेलंट डिजाइन

32

Motorola नं एक नवीन लो बजेट मोबाइल फोन Moto G40s टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन जर्मनीमध्ये आला आहे जो ४जीबी रॅम, ५०एमपी कॅमेरा आणि ५,०००एमएएच बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G40s चे स्पेसिफिकेशन्स

मोटो जी०४एस १६१२ x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५६ इंचाच्या एचडी+ स्क्रीनसह लाँच झाला आहे. हा पंच-होल स्टाइल डिस्प्ले आहे जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास ३ नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. मोटो जी०४एस वॉटर रिपेलंट डिजाइनवर बनला आहे. यात एनएफएसी, ३.५मिमी जॅक, ब्लूटूथ ५.०, ४जी व्हीओएलटीई, ड्युअल सिम आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पीकर देखील देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी Moto G40s च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्सवर सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. रियर कॅमेरा पाहता इथे एलइडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो जी०४एस स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित माययूएक्सवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात यूनिसोक टी६०६ ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो १.६गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

Moto G40s ४जीबी रॅमसह लाँच झाला आहे. या फोनमध्ये ४जीबी वचुर्अल रॅम देखील देण्यात आला आहे जो मोबाइलच्या फिजिकल रॅमसह मिळून याला ८जीबी रॅमची ताकद देतो. मोबाइलमध्ये ६४जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. पावर बॅकअपसाठी मोटोरोला स्मार्टफोन मोटो जी०४एस मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या मोठ्या बॅटरी सोबतच फोनमध्ये १५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.

Moto G40s ची किंमत

मोटोरोलानं जी०४एस Concord Black, Sea Green, Satin Blue आणि Sunrise Orange अश्या ४ कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीनं सध्या याच्या किंमतीची माहिती देण्यात आली नाही परंतु आशा आहे की हा मोबाइल १० हजारांच्या रेंज मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.