Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Motorola च्या नव्याकोऱ्या फोनवर मिळवा भरमसाठ डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये Edge 50 Pro वर ऑफर्स

45

Motorola Edge 50 Pro स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. हा कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे. आज म्हणजे ९ एप्रिलला या स्मार्टफोनचा पहिला सेल सुरु होणार आहे, ज्यात बंपर डिस्काउंटसह कॅशबॅक आणि EMI ऑप्शन मिळत आहे. प्रमुख स्पेसिफिकेशन पाहता, एज ५० प्रो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरसह येतो. फोटोग्राफीसाठी हँडसेट मध्ये ५०एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

Motorola Edge 50 Pro ची किंमत

मोटोरोलानं एज ५० प्रोच्या ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याचा १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल ३५,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी १२ वाजता सुरु होईल. यावर HDFC बँकेकडून २००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच, Axis बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास ५ टक्क्यांचा कॅशबॅक देखील मिळेल. इतकेच नव्हे तर हा लेटेस्ट फोन १,५६७ रुपये दरमहा ईएमआयवर देखील विकत घेता येईल.

Motorola Edge 50 Pro चे स्पेसिफिकेशन

मोटोरोला एज ५० प्रो अँड्रॉइड १४ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा पीओएलईडी डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन १.५एक आहे. यात Style Sync AI जनरेटिव थीमिंग मोड आणि AI अडॅप्टिव स्टॅबिलायजेशनचा सपोर्ट मिळतो. सोबत फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील आहे.

कंपनीनं एज ५० प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसह १२जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात पहिला ५०एमपीची मेन लेन्स, दुसरा १०एमपीचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा १३एमपीची लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी हँडसेट मध्ये ५०एमपीचा कॅमेरा मिळतो.

मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ४५००एमएएचची बॅटरी आहे. सोबत ५०वॉट वायरलेस, १२५वॉट वायर्ड आणि ६८वॉट टर्बो चार्जिंगचा सपोर्ट मिळाला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी सिंगल चार्जमध्ये ३० तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकता, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, स्टीरियो स्पिकर, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे स्पेक्स मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.