Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nubia Flip Price
मीडिया रिपोर्टनुसार, Nubia Flip च्या ८जीबी रॅमव २५६ जीबी मॉडेलची किंमत २९९९ युआन (जवळपास ३५,२०३ रुपये) आहे. १२ जीबी रॅम आणि २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३२९९ युआन (जवळपास ३८,७१७ रुपये) आणि १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३६९९ युआन (४३,४११ रुपये) आहेत. हा डिवाइस Caramel, Milk Tea आणि Taro अश्या दोन ऑप्शनमध्ये मिळेल. Nubia Flip ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. फोन ऑफिशियली १६ एप्रिलला लाँच केला जाईल.
Nubia Flip Specifications
Nubia Flip देखील पारंपरिक क्लॅमशेल डिजाइनसह येतो. फोन अनफोल्ड केल्यावर याची जाडी ७ mm आणि वजन २०९ ग्राम आहे, ज्यामुळे फ्लिप कॅटेगरीच्या लाइटवेट फोनमध्ये याचा समावेश होतो. रिपोर्ट्सनुसार, यात हाय-स्ट्रेंथ असलेला स्पेस-ग्रेड स्टीलच्या हिंजचा वापरण्यात आला आहे जी फोन २ लाखांपेक्षा जास्त फोल्ड आणि अनफोल्ड करू देते.
फोनच्या मागे राउंड डिस्प्ले आहे, ज्याच्या चारही बाजूंना रिंग कॅमेरा आयलंड आहे. राउंड अॅमोलेड डिस्प्ले १.४३ इंचाचा आहे आणि ४६६×४६६ पिक्सल रेजॉलूशनसह येतो. या डिस्प्लेवर नोटिफिकेशन्स येतात, ज्यामुळे वारंवार फोन अनफोल्ड करण्याची झंझट राहत नाही.
फोनचा फ्रंट डिस्प्ले ६.९ इंचाचा आहे. हा एक अॅमोलेड फोल्डेबल डिस्प्ले आहे आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह फुल एचडी प्लस रेजॉलूशनला सपोर्ट करतो. नुबीयाच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७ जेन १ प्रोसेसर आणि अड्रेनो ६४४ जीपीयू देण्यात आला आहे. यात ४३१०एमएएचची बॅटरी आहे, जी ३३वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दावा आहे की ७३ मिनिटांत बॅटरी झिरो ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
Nubia Flip मध्ये ५० मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा आहे, सोबत २ एमपीचा डेप्थ सेन्सर देखील देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा आहे. विशेष म्हणजे प्रायमरी कॅमेरा देखील सेल्फी व व्हिडीओ कॉल्ससाठी वापरता येईल.