Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

किती दिवसांत करावी फ्रीजची सर्व्हिसिंग जाणून घ्या; निष्काळजी राहिल्यास ऐन उन्हाळ्यात फ्रीज पडेल बंद

12

घरांमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरेटर अशा प्रकारे तयार केले जाते की दोन-चार वर्षे त्याकडे लक्ष दिले गेले नाही तरीही ते कोणत्याही अडचणीशिवाय चालते आणि त्यात कोणतीही समस्या उदभवत नाही किंवा कोणतीही खराबी होत नाही. त्यामुळे सहसा फ्रीजच्या रेग्युलर सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, या फ्रीजची थोडी काळजी घेतल्यास तुम्ही ऐन उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर खराब होण्यापासून वाचवू शकता.

उन्हाळ्यात वाढतो रेफ्रिजरेटरवरचा दबाव

उन्हाळ्यात फ्रीजचा वापर लक्षणीय वाढतो. खरे तर तापमान वाढले की घरात ठेवलेले खाद्यपदार्थ लवकर खराब होऊ लागतात. अशावेळी फ्रीजमध्ये जास्तीत जास्त वस्तू ठेवल्या जातात. अशा स्थितीत फ्रीजचे तापमान अनेक अंशांनी कमी करावे लागते. त्यामुळे रेफ्रिजरेटरवरचा दबाव वाढतो. अशात जर तुम्ही फ्रीजची वेळेवरसर्व्हिसिंग केली नाही, तर उन्हाळ्याच्या हंगामात ते कधीही निकामी होऊ शकते. थोडी काळजी घेतल्यास उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर खराब होण्यापासून तुम्ही त्याचा बचाव करू शकता.

कुलिंग कमी होण्याची समस्या

रेफ्रिजरेटरमध्ये काही वर्षे सतत वापर केल्यानंतर सामान्यतः आढळणारी एक समस्या म्हणजे कुलिंगचा अभाव. रेफ्रिजरेटरचे कूलंट संपल्यामुळे किंवा त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे फ्रीजमध्ये कुलींगचा अभाव होतो.अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवता तेव्हा त्यांना दीर्घकाळ ताजे ठेवणे कठीण होऊन बसते.

फ्रीजच्या सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष

बहुतेक लोकांना फ्रीजच्या सर्व्हिसिंगबद्दल माहिती नसते कारण फ्रीज सहसा जास्त काळ टिकतात. त्यामुळे लोक याकडे लक्ष देत नाहीत, परंतु बहुतेक युजर्सची एक मोठी समस्या ही आहे की, काही वर्षांनी जेव्हा फ्रीज खराब होऊ लागतो, तेव्हा त्यात एकामागून एक समस्या येत राहतात, परिणामी त्यांना त्याच्या रिपेअरिंगवर बराच खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी फ्रीजची सर्व्हिसिंग दरवर्षी किमान दोनदा करून घ्यावी, म्हणजे फ्रीजच्या तपासणीसाठी मेकॅनिकला बोलवा आणि त्यात काही दोष आढळल्यास योग्य सल्ला घेऊन त्याचे कुलेंट देखील बदलून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फ्रीज बराच काळ उत्तमरीत्या सुरु ठेवू शकता.

आता फ्रिजच सुचवेल जेवणाचा मेन्यू

सॅमसंगने भारतातील त्यांच्या बेस्पोक अप्लायन्सेसमध्ये एआय क्षमता जोडल्या आहेत. कोरियन निर्मात्याने नवीन रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशीनचे नुकतेच अनावरण केले आहे. ही सर्व डिव्हाईसेस आता AI द्वारे सपोर्टेड आहेत. मुंबईतील सॅमसंगच्या बीकेसी स्टोअरमध्ये या नवीन उपकरणांचे अनावरण करण्यात आले. AI सपोर्टेड रेफ्रिजरेटर हे AI व्हिजन कॅमेऱ्यासह येते जे सुरुवातीला साधारण 33 खाद्यपदार्थांची ऑटोमॅटिकओळख करण्यास मदत करते. युजरने कालांतराने केलेल्या स्टोअरेजच्या आधारावर ओळखल्या जाऊ शकणाऱ्या वस्तूंची संख्या कालांतराने वाढेल. रेफ्रिजरेटर, त्याच्या स्क्रीनद्वारे, साठवलेल्या खाद्यपदार्थांच्या आधारे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी काय शिजवायचे हे सुचवते. युजर्सना एखादा खाद्यपदार्थ कधी संपणार आहे हे देखील याद्वारे सूचित केले जाईल. .

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.