Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली कमाई
‘मैदान’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ हे दोन्ही चित्रपट खरंतर १० एप्रिलला प्रदर्शित होणार होते पण ईद ११ तारखेला आलस्यामुळे ईदच्या मुहूर्तावर ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात आले. ‘बडे मियां छोटे मियां’ भारतात जवळपास २५०० चित्रपटगृहाच्या स्क्रीनवर प्रदर्शित झाला तर ‘मैदान’ फक्त २००० चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. अक्षय आणि टायगरचा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे बजेट जवळपास ३५० कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटाचं बजेट १०० कोटी रुपये असूनही तो चित्रपटगृहात चालतोय. त्यामुळे ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाला अजून मेहनत करावी लागणारे. अक्षय आणि टायगर या दोघांचेही आधीचे चित्रपट सतत फ्लॉप गेले त्यामुळे यावेळी निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटातील अक्षय आणि टायगरचे डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस न पडल्याचे दिसून येतंय.
‘बडे मियां छोटे मियां’ची पहिल्या दिवशीची कमाई
रिपोर्टनुसार, ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमुळे १५.५० कोटींची कमाई केलीये. परंतु या चित्रपटाची जगभरातील कमाईचा आकडा समोर आलेला नाहीये.
मैदान
अजय देवगनच्या ‘मैदान’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ७.१० कोटी रुपये कमाई केली असून ‘बडे मियां छोटे मियां’ च्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. फुटबॉलरचा बायोपिक असल्यामुळे त्यातील डायलॉग्स उत्तम आहेत त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला पसंती दर्शवतायत.