Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nokia नं गुपचूप सादर केले तीन दमदार फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

21

Nokia ब्रँड बंद होत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. परंतु आता HMD नं Nokia ब्रँड अंतर्गत तीन दमदार फीचर फोन्स सादर केले आहेत. हे नोकियाच्या क्लासिक्स फोन्सचे मॉडर्न व्हर्जन आहेत आणि Nokia 6310, Nokia 5310, आणि Nokia 230 नावाने कंपनीच्या साइटवर लिस्ट झाले आहेत. कंपनीनं या फोन्सच्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. चला जाणून घेऊया फीचर्सची माहिती.

किंमत आणि इंडिया लाँच डिटेल

नोकिया 6310 (2024) ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये, नोकिया 230 (2024) ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये आणि नोकिया 5310 (2024) ब्लॅकसह रेड आणि व्हाइटसह रेड कलरमध्ये आले आहे. कंपनीनं या फोन्सची किंमत किती असेल आणि उपलब्धता याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे फिचर फोन्स भारतासह जगभरात उपलब्ध होऊ शकतात.

Nokia 230 (2024) चे स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये २.८ इंचाचा (३२० x २४० पिक्सल) क्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत Unisoc 6531F प्रोसेसर आहे आणि हा 30+ ओएसवर चालतो. यात ८ एमबी रॅम, १६ एमबी इंटरनल स्टोरेज, मायक्रोएसडीसह ३२ जीबी पर्यंत मेमरी आहे.

यात सीरीज एलईडी फ्लॅशसह २एमपी फिक्स्ड फोकस रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला एलईडी फ्लॅशसह २एमपी फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे.याची साइज १२४.६ x ५३.४ x १०.९ मिमी आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, २जी, स्लॅम शेयरिंगसह ब्लूटूथ ३.०, यूएसबी टाइप-सी असे फिचर मिळतात. डिवाइसमध्ये २७ दिवसांपर्यंतच्या स्टँडबाय टाइमसह १४५० एमएएचची रिमूव्ह्हेबल बॅटरी आहे.

Nokia 5310 (2024) चे स्पेसिफिकेशन

नवीन नोकिया 5310 वर्ष २०२० मॉडेलचा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून आला आहे. यात २.८ इंचाचा (३२० x २४० पिक्सल) क्यूवीजीए डिस्प्ले आहे. तसेच, यात Unisoc 6531F प्रोसेसर आहे आणि ही सीरीज ३०+ ओएसवर चालते. डिवाइस ८ एमबी रॅम, १६ एमबी इंटरनल स्टोरेज, मायक्रोएसडीसह ३२ जीबी पर्यंत मेमरीसह आला आहे.

डिव्हाइसमध्ये एलईडी फ्लॅशसह ०.३ एमपी वीजीए रियर कॅमेरा आहे. तसेच, यात ३.५ मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो (वायर्ड आणि वायरलेस ड्युअल मोड), एमपी३ प्लेयर आहे. डिवाइसची साइज १३५.५×५६.०×१४.१ मिमी आहे आणि फोनमध्ये २जी (९००/१८००), ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटी फीचर आहेत. तसेच २७ दिवसांपर्यंतच्या स्टँडबाय टाइमसह १४५०एमएएचची रिमूव्ह्हेबल बॅटरी आहे.

Nokia 6310 (2024) चे स्पेसिफिकेशन

हा फोन २०२१ मध्ये आलेल्या नोकिया 6310 चा अपग्रेडेड मॉडेल आहे. यात २.८ इंच (३२० x २४० पिक्सल) क्यूवीजीए डिस्प्ले आहे. तसेच Unisoc 6531F प्रोसेसर मिळतो आणि हा सीरीज ३०+ ओएसवर चालतो. डिव्हाइसमध्ये ८ एमबी रॅम, १६ एमबी इंटरनल स्टोरेज, मायक्रोएसडीसह ३२ जीबी पर्यंत मेमरी आहे. फीचर फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह वीजीए रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये ३.५ मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो (वायर्ड/वायरलेस), ड्युअल फ्रंट फेसिंग स्पिकर आहेत.

याचा आकार १३२ x ५७ x १३.१ मिमी आणि वजन फक्त ८८.२ ग्राम आहे.फोनमध्ये २जी (९००/१८००), ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटीसाठी मिळतात. यातील १४५० एमएएचची रिमूव्ह्हेबल बॅटरी २७ दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.