Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय आडनावाची खिल्ली उडवणे कंपनीच्या अंगाशी, नुकसान भरपाई म्हणून मोजावे लागले तब्बल १० हजार डॉलर्स

8

मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी स्किन बनवणाऱ्या कॅनडातील एका कंपनीला सोशल मीडियावर भारतीय माणसाची खिल्ली उडवणे महागात पडले. या कंपनीचे नाव dbrand हे आहे, ही कंपनी मोबाईल स्किन तयार करण्यासाठी ओळखली जाते, अलीकडेच X वर त्याच्या एका वापरकर्त्याच्या आडनावाची खिल्ली उडवणारी पोस्ट कंपनीने शेअर केली खिल्ली. कंपनीला नंतर लोकांची माफी मागावी लागली आणि नुकसान भरपाईच्या नावावर यूजरला १०,००० डॉलर्स देखील द्यावे लागले. बघूया काय आहे प्रकरण

X वापरकर्ता भुवन चित्रांशने प्लॅटफॉर्मवर त्याच्या मॅकबुकवर अप्लाय केलेल्या डीब्रँड स्किनबद्दल तक्रार व्यक्त केली आणि कंपनीने त्यावर उपाय शोधला. वापरकर्त्याने, सांगितल्यानुसार त्याच्या मॅकबुकच्या स्किनचा रंग केवळ दोन महिन्यांतच बदलला. मॅकबुक स्किनचा फोटो शेअर करत चित्रांशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “काही महिन्यांपूर्वी @dbrand कडून ही स्किन खरेदी केली. फक्त २ महिन्यांनंतरही तो रंग नाहिसा झाला. आता मी काय करायचं?

उत्तरात कंपनीने केली थेट आडनावावर मस्करी

या ट्विटवर उत्तर देतांना कंपनीने चित्रांशच्या आडनावाची खिल्ली उडवली कंपनीने म्हटले की मुळात तुझे आडनावाच एक मुर्खपणाचे आहे, आधी ते सीरियस होणे आवश्यक आहे. डी ब्रॅंडच्या या आक्षेपार्ह ट्विटमुळे युजर्समध्ये संताप पसरला. डीब्रँडचे हे आक्षेपार्ह विधान मायक्रोब्लॉगिंग साइटवर व्हायरल झाले आणि वापरकर्त्यांमध्ये संताप पसरला. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे की पूर्ण वाढ झालेल्या प्रौढांना देखील २०२४ मध्ये वर्णद्वेष अजूनही ठीक आहे असे वाटते. मोठे व्हा, सामान्य सभ्यता समजून घेण्यासाठी तुम्हाला अल्पसंख्याक असण्याची गरज नाही.” तर दुसऱ्याने उत्तर दिले, “मित्रा, तू इथली रेषा पूर्णपणे ओलांडली आहेस,तिसऱ्या वापरकर्त्याने कंपनीला थेट धमकी दिली आणि लिहिले, “चांगले नाही. परदेशी नावाची आणि 1 अब्जाहून अधिक लोकांच्या बाजारपेठेची खिल्ली उडवणे महागात पडेल ही लोक कदाचित तुमचे प्रॉडक्ट पुन्हा कधीही खरेदी करणार नाहीत.”

dbrand कंपनी नंतर लाईनवर आल्याचे बघायला मिळाले. तीव्र विरोधानंतर कंपनीने लिहिले की दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यानंतरही युजर्सचा राग थांबला नाही आणि सोशल मीडियावर ट्विटची मालिका सुरूच राहिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.