Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

असा दिसेल Google चा सर्वात स्वस्त फोन; वनप्लसला टक्कर देईल Pixel 8A

5

Google Pixel 8A स्मार्टफोन Google I/O इव्हेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा इव्हेंट कंपनी मे मध्ये करत आहे. फोनबाबत आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. ज्यात याचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समजले आहेत. आता आणखी एका लीकमधून याचे चार कलर व्हेरिएंट देखील दिसले आहेत. याआधी फोनचे फोटो देखील लीक झाले होते परंतु आता फोन चार कलर ऑप्शनमध्ये लीक झाला आहे.

Google Pixel 8A एक मिडरेंज स्मार्टफोन डिवाइस असेल जो कंपनी पुढील महिन्यात सादर करणार आहे. लाँचपूर्वीच फोन चार कलरमध्ये दिसला आहे. अँड्रॉइड हेडलाइन्सच्या रिपोर्टनुसार, Google Pixel 8A चे कलर व्हेरिएंट्स समोर आले आहेत Obsidian, Mint, Porcelain, आणि Bay कलरचा समावेश आहे. डिजाइन पाहता फोन याआधी आलेल्या मॉडेल सारखीच आहे.

मिंट कलर हिरव्या रंगाशी मिळताजुळता आहे. याचे ऑब्सिडियन आणि पोर्सलेन कलर ब्लॅक आणि व्हाइट सारखे आहेत. तर बे कलरमध्ये एक ब्लू शेड देण्यात आली आहे. याआधी ही शेड Google Fi च्या जाहिरातीत दिसते. इथे देखील चांगली बाब म्हणजे ज्या युजर्सना ब्लॅक आणि व्हाइट कलर्सचा कंटाळा आला आहे त्यांना कंपनी आकर्षक कलर ऑप्शन देत आहेत. फोनच्या लाँच पूर्वीच लीक्समध्ये अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

Google Pixel 8a चे लीक स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 8a मध्ये ६.१ इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल, अशी माहिती टिपस्टर योगेश ब्रारनं दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं बनवलेला Tensor G3 चिपसेट दिला जाऊ शकतो. याच प्रोसेसरचा वापर गुगलनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज पिक्सल ८ मध्ये देखील केला होता. हा फोन १२८जीबी आणि २५६जीबी स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टम पाहता आगामी पिक्सलमध्ये अँड्रॉइड १४ ओएस मिळू शकतो.

Pixel 8a मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ओआयएस सपोर्ट असलेला ६४एमपीचा प्रायमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. असाच कॅमेरा सेटअप गेल्यावर्षी आलेल्या पिक्सल ७ए मध्ये देखील मिळाला होता. स्मार्टफोनमध्ये ४,५०० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी २७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.