Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फोनच्या खरेदीवर इलेक्ट्रिक कार फ्री; शाओमीनं आणली जबरदस्त ऑफर

10

Redmi Turbo 3 स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्या ग्राहकांसाठी शाओमीनं एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. रेडमी टर्बो ३ खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकाला कंपनी एक वर्षासाठी Xiaomi SU7 कार चालवण्यास देणार आहे. Xiaomi चे सीईओ लेई जून यांनीं काही दिवसांपूर्वी या ऑफरची घोषणा केली होती की जर Redmi Turbo 3 स्मार्टफोननं आपलं पाहिलं सेल्स टारगेट पूर्ण केलं तर कंपनी त्याचबरोबर Xiaomi SU7 कार गिफ्ट करेल.

Redmi नं १० एप्रिलला हा फोन चीनमध्ये लाँच केला होता. Redmi Turbo 3 एक परफॉरमेंस सेंट्रिक फोन आहे जो कंपनी २७६ डॉलर्सच्या बेस प्राइसमध्ये सादर केला आहे. ही किंमत सुमारे २३,००० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.

Redmi Turbo 3 सह १ वर्षासाठी मोफत मिळेल SU7 कार

बातमी अशी आहे की Redmi Turbo 3 ची विक्रमी विक्री झाली आहे आणि कंपनीनं ३० मिनिटांत हजारो फोन विकले आहेत. रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर वांग टेंग यांनी वीबोवर आभार व्यक्त केले आणि घोषणा केली आहे की टर्बो ३ फोन खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना १ वर्षभर Xiaomi SU7 कार वापरण्याची संधी दिली जाईल.

Xiaomi चे मॅनेजर वांग टेंग २३ एप्रिलला आपल्या अधिकृत वीबो अकाऊंटवर विजेत्यांची घोषणा करतील. ही कार मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्यांच्याकडे कमीत दोन वर्ष जुनं ड्राईव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

भारतीयांना मिळणार नाही ही ऑफर

ही ऑफर फक्त चीनमध्ये लागू करण्यात आली आहे. Redmi Turbo 3 स्मार्टफोन आणि Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार देखील भारतीय बाजारात आले नाहीत. रेडमी टर्बो ३ नव्या नावाने भारतात येऊ शकतो. परंतु शाओमी एसयु७ कार देशात येण्याची शक्यता खूप कमी आहे.

Redmi Turbo 3 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Turbo 3 मध्ये ६,६७ इंचाचा ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह १.५के रिजोल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २,४०० नीट्स पीक ब्राईटनेस मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ओआयएस असलेला ५०एमपीचा मुख्य सेन्सर आणि ८एमपीची अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. फ्रंटला २०एमपीचा कॅमेरा मिळतो.

प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत १६जीबी पर्यंत रॅम व १टीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. यातील ५०००एमएएचची बॅटरी ९० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर चालतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.