Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

6

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा, म्हणजेच संकल्पपत्र रविवारी (१४ एप्रिल) सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रसिद्ध केले जाणार आहेत. मोदींची गॅरेंटी, मोदीप्रणित चार जाती (ज्ञान, हिंदीत ‘ग्यान’), २०४७पर्यंतचा विकसित भारत यांसारख्या ठळक मुद्द्यांवर यात लक्ष केंद्रीत केले जाईल, हे स्पष्ट आहे. भाजपचा यंदाचा निवडणूक जाहीरनामा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध केला जाईल, याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याआधी दिले आहे.

भाजपच्या संकल्पपत्राच्या प्रकाशन कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व पक्षाचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. देशाच्या राजधानीतील ६, दीनदयाळ मार्गावरील भाजप मुख्यालयाच्या विस्तारित वास्तूच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ल २७ सदस्यीय जाहीरनामा समितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल हे निमंत्रक आणि सहसंयोजक आहेत.
आजचा अग्रलेख : नव्या चर्चेची चौकट

‘अब की बार ४०० पर’ या घोषणेसह भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे. सत्तारूढ पक्षाचे हे प्रस्तावित संकल्पपत्र हा मोदी सरकारच्या ‘तिसऱ्या कार्यकाळा’तील अपेक्षा व दृष्टिकोनाचा दस्तऐवज असणार आहेस असे सांगण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह विष्णू देव साई (छत्तीसगड) आणि मोहन यादव (मध्य प्रदेश) या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे. भाजपचा निवडणूक जाहीरनामा हा मोदी सरकारची धोरणे, उद्दिष्टे आणि प्रस्तावित कृती कार्यक्रमांचा व्यापक दस्तावेज असणार आहे.
आरक्षणमर्यादा हटवणार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाच न्याय, २५ हमी; जातनिहाय जनगणनेचंही आश्वासन

केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास मतदारांना विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका समजून घेण्यासाठी हे संकल्पपत्र उपयुक्त ठरेल. मतदार यात दिलेली आश्वासने पाहू शकतात आणि पक्ष कारभारात पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करतो की नाही याचे मूल्यांकन करू शकतात. भाजपने मोदी सरकारच्या काळात, जे सांगितले ते केले असा पक्षाचा दावा आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राममंदिर, तीन तलाकबंदी आदी मुद्द्यांची उदाहरणे भाजप नेते देतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.