Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

sharad pawar: काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा

18

हायलाइट्स:

  • शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असे वक्तव्य शिवसेना नेते अनंत गीते यांनी केले आहे.
  • त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
  • शरद पवारांनी नाही, तर काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले.

कल्याण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असे विधान शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केल्यानंतर त्यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. गीते यांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (union minister ramdas athawale gives reaction over shiv sena leader anant geete on sharad pawar)

रामदास आठवले आज कल्याण येथे पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गीते यांच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला नसून काँग्रेसनेच पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील यांचे रजनी पाटील यांच्याबाबत खळबळजनक विधान, म्हणाले…

गीते यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, मी सन १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत होतो. मात्र शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला हे म्हणणे योग्य नाही. उलट काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे अनंत गीते यांचा आरोप चूकीचा आहे.

… तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये- आठवले

शिवसेनेचे नेते अनंत गीत यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला असल्याने आता शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतावे आणि भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती भिमशक्तीचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ऐतिहासिक अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या सौंदर्याने हरखून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

‘शिवसेनेने दसऱ्याच्या आधीच शिवसेनेत यावे’

शिवसेनाला आवाहन करताना आठवले म्हणाले की शिवसेनेला आपले भवितव्य उज्ज्वल करायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू नये. शिवसेना आणि भाजपने अडीच वर्षांच्या फार्म्युल्यावर एकमत करून एकत्र आले पाहिजे. असे करून राज्याच्या विकासाला चालना द्यावी, असे आठवले म्हणाले. असे झाल्यास केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवून मुंबई आणि राज्याचा विकास होईल. याचा विचार करू उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा आणि दसरा मेळाव्याच्या आधीत त्यांनी भाजपसोबत आले पाहिजे असेही आठवले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी: आशीष शेलार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.