Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsAppमधील चॅट, फोटो आणि डेटा चुटकीसरशी करा नवीन नंबरवर ट्रान्सफर, जाणून घ्या काही सोप्या स्टेप्स

10

काही कारणास्तव तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलावा लागल्यास बॅकअप सबंधित डोकेदुःखी निर्माण होते. सर्वात आधी सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे नंबर बदलल्यास व्हॉट्सऍप डेटाचे काय होईल. पण आता या गोष्टीचे टेन्शन घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. आज आपण एका अशा व्हॉट्सऍपच्या बिल्ट-इन फिचरबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा आपण करुन तुम्ही चॅट, फोटो व ऍपमध्ये असलेला इतर डेटा ट्रान्सफर करू शकतात. यात ग्रुप चॅटचा देखील समावेश असतो तुम्ही एका नंबरकडून सहजसहजी दुसऱ्या नंबरवर वळवू शकतात. जाणून घेऊया कसे..
तुम्ही देखील तुमचा नंबर बदलताय मात्र युजर अकाऊंट तुम्हाला तसेच पूर्वीसारखे ठेवायचे आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

व्हॉट्सऍपवर फोन नंबर कसा बदलावा

नंबर बदलण्याची ही प्रक्रिया सुरू करण्याआधी हे लक्षात ठेवा की तुम्हाला त्याच मोबाईलमध्ये नंबर बदल करण्याचा असल्यास हरकत नाही मात्र दुसऱ्या मोबाईलमध्ये हे करायचे असल्यास तुम्हाला अशी लोकल बॅकआप घ्यावा लागेल.

स्टेप १: आपल्या जुन्या मोबाईवर Whatsapp उघडा

स्टेप २: सेटिंग्जवर जावून उजव्या कोपऱ्यातील ३ ठिपक्यांवर क्लिक करा, iPhone युजर्ससाथी हे उजव्या कोपऱ्यात ऑप्शन देण्यात आले आहे.

स्टेप ३: “अकाउंट”वर टॅप करुन “चेंज नंबर”वर क्लिक करा

स्टेप ४: स्क्रीनवरील माहितला रिव्ह्यू करा. यात दिलेल्या माहितीनुसार तुमचं चॅट आणि नंबरमधील इतर डेटा ट्रान्सफर होईल.

स्टेप ५: आता “पुढील” वर टॅप करा आणि तुमचा जुना आणि नवीन फोन नंबर टाका. कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करण्यासाठी पुन्हा तपासा.

स्टेप ६: आता तुम्हाला तुमच्या संपर्कातील व्यक्तींना कसे कळवायचे आहे हा ऑप्शन निवडा

स्टेप ७: ऑल काँटॅक्ट: हे ऑप्शन निवडल्यास तुमच्या संपर्कातील सगळ्यांना तुम्ही नंबर बदलल्याचे कळेल

स्टेप ८: तुम्ही ही माहिती पोहोचवण्यासाठी कस्टम काँटॅक्टची देखील निवड करू शकतात.

स्टेप ९: ट्रान्सफर प्रोसेसला सुरुवात करण्यासाठी डनवर क्लिक करा

शिवाय तुम्ही तुमचा फोन आणि सिम कार्ड दोन्ही बदलत असल्यास, तुम्हाला तुमच्या जुन्या डिव्हाइसवर सर्वप्रथम लोकल बॅकअप घेणे आवश्यक आहे. हे बॅकअप घेण्याची सोपी पद्धत पाहा

  • व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.
  • “चॅट्स” वर टॅप करा आणि नंतर “चॅट बॅकअप” निवडा.
  • बॅकअपची फ्रिक्वेन्सी निवडा. येथे तुम्ही डेली, विकली किंवा मॅन्युअल बॅकअपचा पर्याय निवडू शकता.
  • बॅकअपमध्ये व्हिडिओचा समावेश करायचा किंवा नाही त्याची निवड करा ( व्हिडिओ समाविष्ट केल्याने बॅकअपचा आकार वाढू शकतो.)
  • प्रक्रिया सुरू करण्यासाठी “बॅक अप” वर टॅप करा. असे केल्याने, तुमच्या चॅट तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये सेव्ह होतील.

नवीन फोनवर बॅकअप कसे इन्स्टॉल करावे

  • तुमच्या नवीन फोनमध्ये WhatsApp डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • सेटअप प्रोसेस करताना तुमचा नवीन नंबर टाका
  • प्रॉम्ट मिळाल्यावर लोकल बॅकअप इन्स्टॉल करा

शिवाय, तुम्ही जुन्या फोन मधील WhatApp नवीन फोनमध्ये शेअर करुन वरील स्टेप्सचा वापर करून तुमचे बॅकअप पुन्हा परत मिळवू शकतात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.