Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उद्दिष्ट लक्षात घेऊन अनेक आधुनिक फीचर्सने युक्त असे नवीन एसी ‘2024 लाइनअप’ या सीरीज अंतर्गत लाँच केले आहेत. या नवीन सीरीज बद्दल जाणून घेऊया .
LG एअर कंडिशनर्सची नवीन 2024 लाइनअप
LG ने भारतात एअर कंडिशनर्सची नवीन 2024 लाइनअप लॉन्च केली आहे. LG ने नवीन एनर्जी मॅनेजर फीचर्ससह 77 नवीन AC मॉडेल सादर केले आहेत जे कूलिंगशी तडजोड न करता वीज वाचविण्यात मदत करतात. नवीन एसीमध्ये युजर्सना LG ThinQ ॲपद्वारे स्मार्ट कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. यासोबतच १ टन, १.५ टन आणि २ टन कॅपिसिटीचे नवीन एसी उपलब्ध आहेत. 2024 मध्ये LG ने AC ची विक्रमी विक्री केली आहे, कंपनीने आतापर्यंत 1 मिलियन AC विकले आहेत.
किंमत आणि उपलब्धता
एनर्जी मॅनेजरसह येणाऱ्या नवीन LG AC रेंजची किंमत 35,000 रुपयांपासून सुरू होते आणि ती 60,000 रुपयांपर्यंत जाते. हे AC Amazon, Flipkart यांवर ऑनलाईन तर,LG शोरूम आणि भारतातील आघाडीच्या ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
एलजी 2024 एसी लाइनअपचे फीचर्स
- एलजी एसीच्या 2024 लाइनअपचे सर्वात मोठे फीचर म्हणजे ‘एनर्जी मॅनेजर फीचर’. या फीचरमुळे युजर कूलिंगशी तडजोड न करता वीज वाचवू शकतील. हे फीचर ‘LG ThinQ’ ॲपद्वारे ऍक्सेस केले जाऊ शकते, कारण AC मध्ये WiFi कनेक्टिव्हिटी आहे.
- LG ACs ची नवीन रेंज स्प्लिट आणि विंडो कॉन्फिगरेशन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.
- नवीन AC चे एनर्जी सेव्हिंग रेटिंग 3 स्टार आणि 5 स्टार दरम्यान असते.
- एसीमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी इन्व्हर्टर कंप्रेसरसह 4-इन-1 आणि 6-इन-1 कॉन्व्हर्टेबल टेक्निक देखील आहे.
- नवीन LG AC मध्ये गंज टाळण्यासाठी गोल्ड फिन कोटिंगसह कॉपर कंडेन्सर आहे.
- नवीन एसी हिमक्लीन फंक्शनने सुसज्ज आहेत जे बॅक्टेरिया टाळण्यास मदत करतात.
- नवीन मॉडेल्समध्ये लो गॅस डिटेक्शन आणि फाउल स्मेल डिटेक्शन ही फीचर देखील आहेत.
- नवीन एसी युजर्सना मशीनला कोणतीही अडचण आल्यावर अलर्ट करतात जेणेकरुन युजर AC चे कोणतेही नुकसान न करता त्वरित दुरुस्ती करू शकतात.
- LG ने इनडोअर युनिटवर ब्लॅक मिरर फिनिशसह एसींची नवीन आर्टकूल सीरीज देखील सादर केली आहे.