Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Uberला बसला भूरदंड! ग्राहकाकडून २७ रुपये जास्त घेतल्याच्या मोबदल्यात द्यावे लागले तब्बल २८,००० रुपये, काय आहे प्रकरण

11

Uber कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकाकडून जास्त पैसे चार्ज केल्यामुळे कंपनीवर ही नामुष्की ओढवली आहे. अनेकदा ऑनलाइन बुकिंग करुन कॅब किंवा इतर प्रवासी वाहनाने प्रवास केलास या प्रकारची प्रकरणे घडत असतात. चंदिगढ येथील ग्राहक सेवा आयोगाने Uber इंडियाला २८,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. चालकाने ग्राहकाकडून बिलापेक्षा २७ रुपये जास्त घेतल्यामुळे कंपनीला या कारवाईचा सामना करावा लागला आहे.

आयोगाने उबर इंडियाला तक्रारदार ऋत्विक गर्गला २७ रुपये परत करण्याचे आदेश दिले होते, जे त्याच्याकडून आकारण्यात आलेल्या शुल्कापेक्षा जास्त होते, तसेच नुकसानभरपाई म्हणून ५,००० रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून ३,००० रुपये देण्याचे देखील आदेश दिले आहेत. आयोगाने म्हटले आहे की, ग्राहकांच्या विश्वासाला तडा पोहचवणाऱ्या खाजगी कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.” कंपनीला तक्रारदाराला नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून द्यायच्या रकमेव्यतिरिक्त आयोगाच्या ग्राहक कायदेशीर सहाय्य खात्यात भरपाई म्हणून किमान २०,००० रुपये जमा करावे लागतील.

प्रवाश्याला मिळाले ७ कोटींचे बिल

आशिष मिश्रा नामक व्यक्तीने सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. त्यानुसार दीपक तेनगुरिया या एका व्यक्तीने उबेरवरुन रिक्षा बुक केली. त्याला ज्या लोकेशनवर जायचे होते, तिथंपर्यंतचे प्रवास भाडे जवळपास ६२ रुपये येते. परंतु प्रत्यक्ष तो लोकेशनवर पोहचल्यावर त्याला धक्काच बसला. त्याला या छोट्याशा राईडसाठी तब्बल ७.६६ कोटी रुपये इतके भाडे दाखवण्यात आले. दीपक यांनी या प्रकरणाचा हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

काय होते प्रकरण?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि यावर जोरदार कॉमेंटबाजी सुरु झाली. या व्हिडिओत दीपकला बिलाबद्दल विचारण्यात आले असता त्याने हे भरमसाट बिल दाखवले. विशेष म्हणजे ७.६६ लाखांच्या या बिलावर कोणताही अतिरिक्त चार्ज लागलेला नाही. Uber इंडियाच्या कृत्त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.