Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्तनाच्या कॅन्सरने २०४०पर्यंत लाखो मृत्यू,‘लॅन्सेट’चा इशारा; मात्र मृत्यू ‘अटळ’ नसल्याचा दिलासाही

32

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगभरात कॅन्सरच्या विविध प्रकारांमध्ये स्तनांचा कॅन्सर हा सध्याच्या घडीला सर्वाधिक आढळणारा कॅन्सर ठरला असून यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा २०४०पर्यंत वर्षाला दहा लाखांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज नवीन लॅन्सेट आयोगाने मांडला आहे.

आकड्यांवर नजर
जगभरात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत
स्तनांच्या कॅन्सरची रुग्णसंख्या ७८ लाख
मृत्यू ६.८५
वयाची ७५ वर्षे पूर्ण करण्याआधी १२ पैकी एका महिलेला स्तनांच्या कॅन्सरचे निदान

मोठी वाढ
२०२०-२३ लाख रुग्ण
२०४०-३० लाख रुग्ण, १० लाख मृत्यू (अंदाजे)
कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अधिक फटका

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
उच्च उत्पन्न देश- ९० टक्के
भारत-६६ टक्के
दक्षिण आफ्रिका- ४० टक्के

मृत्यूला आळा घालणे शक्य
– उच्च उत्पन्न देशांत मृत्यूमध्ये घट ४० टक्के
– अल्प व मध्यम उत्पन्न देशांमध्ये हे शक्य झालेले नाही.
– उशिरा निदान होणे, निदान-उपचाराच्या कमी सुविधा ही कारणे

उच्च उत्पन्न देशांमध्ये स्तनांच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. हे आधुनिक वैद्यकशास्त्राचे यश आहे. मात्र उपचार न पोहोचणाऱ्या रुग्णांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

– शार्लोट कोल्स, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, यूके

अभ्यासकांच्या शिफारशी
– अल्कोहोलचे सेवन, लठ्ठपणा यांसारखे नियंत्रणात असलेले ‘धोक्याचे घटक’ टाळण्याच्या दृष्टीने धोरणांमध्ये महत्त्वाचे बदल आवश्यक. त्याद्वारे एक चतुर्थांश स्तनांचे कॅन्सर टाळणे शक्य.
– वैद्यकीय व्यावसायिकांना संवादाचे प्रशिक्षण- रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये योग्य संवाद असणे हे जीवनमान, स्वशरीर प्रतिमा, उपचारांतील सातत्य यांसाठी आवश्यक ठरते. यामुळे आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढते.
– उपचारांविषयी निर्णयात रुग्णाचा सहभाग असावा, यासाठी त्यांना आपले मत व्यक्त करण्यास, प्रोत्साहित करणे गरजेचे.
– स्तनाच्या कॅन्सरशी संबंधित शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणामांचे अचूक मापन करण्यासाठी पद्धती निश्चित करणे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.