Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सिद्धू आणि त्यांचे पती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परमपालकौर सिद्धू पंजाब राज्य औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्य सचिवांनी राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.
सिद्धू यांनी दिल्लीत भाजपप्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री मान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सिद्धू यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याचे जाहीर केले. ‘त्यांचा राजीनामा अद्याप पंजाब सरकारने स्वीकारलेला नाही. बीबाजींना (परमपालकौर सिद्धू) आयएएस होण्याचीही घाई झाली होती. मात्र, नोकरी सोडण्याची विशिष्ट प्रक्रिया असते. कृपया राजीनाम्याची प्रक्रिया समजून घ्या; अन्यथा तुमची सारी कमाई धोक्यात येऊ शकते,’ असे मान यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत परमपालकौर सिद्धू?
– परमपालकौर सिद्धू २०११च्या तुकडीच्या भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी आहेत.
– त्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता.
– मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला.
– त्या भटिंडा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवतील, अशी चर्चा काही दिवसांपासून होती.
– अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरतकौर बादल सध्या भटिंडाच्या खासदार आहेत.