Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला; ३०० ड्रोन अन् क्षेपणास्त्रे डागले, इस्रायल हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार?

4

वृत्तसंस्था, तेल अविव : आपल्या लष्करी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने रविवारी इस्रायलच्या दिशेने जवळपास ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी ९९ टक्के ड्रोन, क्षेपणास्त्रे भेदण्यात यश आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. मात्र, इस्रायल या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता असल्याने पश्चिम आशियात तणाव कायम आहे.इराणच्या हल्ल्याचा अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रांनी तीव्र निषेध केला. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या संरक्षणाबाबत कटिबद्धता व्यक्त करीत तातडीने ‘जी ७’ गटाची परिषद बोलावण्याची घोषणा केली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला. पश्चिम आशियात विध्वंसाची बिजे रोवण्याचा उद्देश असल्याचे इराणने अधोरेखित केले असून, या हल्ल्यामुळे या प्रदेशात तणाव आणि अस्थैर्य वाढण्याची भीती सुनक यांनी व्यक्त केली. इस्रायल आणि आमच्या अन्य सहकारी देशांच्या संरक्षणासाठी ब्रिटन तत्पर राहील, असेही सुनक यांनी स्पष्ट केले.

एप्रिलच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियात केलेल्या हल्ल्यात इराणी लष्कराचे दोन जनरल ठार झाल्यानंतर इराण-इस्रायल संघर्षात नवी ठिणगी पडली. या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा इराणने दिला होता. अखेर इराणने शनिवारी मध्यरात्री इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. सुमारे ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली. हे हल्लासत्र रविवारी सकाळी संपल्याचे इराणने जाहीर केले आणि त्यानंतर इस्रायलने आपले हवाईक्षेत्रही खुले केले. ‘इराणने १७० ड्रोन आणि १२० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील ९९टक्के हवेतच पाडण्यात आली’, असे इस्रायलने सांगितले.

या हल्ल्यात इस्रायली हवाई तळाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात तिला जबर दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी याबाबत तपास सुरू असल्याचे इस्रायली पोलिसांनी सांगितले.

‘आम्ही क्षेपणास्त्रे भेदली. हल्ला रोखला. संघटितपणे आपणच जिंकू’, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, इस्रायलविरोधी मोहीम थांबवण्यात आल्याची घोषणा करताना इराणचे जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांनी आणखी हल्ले करण्याचा विचार नसल्याचे सांगितले.
संघर्षाची धग भारताला, इराणने पकडलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय कर्मचारी, का पकडले जहाज?
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुमारे साडेचार दशकांपासून सुरू असून, उभय देशांनी अनेकदा एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. मात्र, इराणने रविवारी केलेल्या हल्ल्याची तीव्रता अधिक होती, असे मानले जाते. मात्र, आपल्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे इस्रायलने हे हल्ले रोखण्यात यश मिळवले. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने ही प्रणाली विकसित केली आहे.

एअर इंडियाची सेवा स्थगित

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रविवारी तेल अविवची सेवा तूर्त स्थगित केली. एअर इंडियाची दिल्ली ते तेल अविव अशी सेवा आठवड्यातून चार वेळा असते. ती स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोदींचं २०१४ चं भाषण आणि केळी विकणाऱ्याचा किस्सा, मेहबूब शेख यांचं सोलापुरातलं तुफान भाषण

भारताची चिंता

पश्चिम आशियातील तणावामुळे भारताने चिंता व्यक्त केली. इराण आणि इस्रायलने राजनैतिक पातळीवर संवाद सुरू करून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारताने केले. भारताचे दोन्ही देशांतील दूतावास संपर्कात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.