Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Asus Zenbook Duo (2024) ड्युअल डिस्प्लेसह भारतात झाला लॉन्च, स्पेसीफीकेशन्स व अशी असेल किंमत

13

Asus Zenbook Duo (2024) ड्युअल डिस्प्लेसह भारतात लॉन्च झाला आहे. डीटॅचेबल कीबोर्डसह या लॅपटॉपमध्ये १४ इंचाच्या दोन स्क्रिन्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय, हा लॅपटॉप Intel Core Ultra 9 प्रोसेसर, 32GB LPDDR5x RAM आणि 2TB SSD स्टोरेजसह सुसज्ज असेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी या लॅपटॉपमध्ये फुल-एचडी AiSense IR कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ऑडिओसाठी, यात डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह दोन हार्मोन कार्डोन ट्यून केलेले स्पीकर आहेत. तर, याची बॅटरी 75WHr आहे, ज्यामध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. लॅपटॉपची किंमत आणि फिचर्स संबंधित डिटेल्स जाणून घेऊया.

Asus Zenbook Duo (2024) price in India

कंपनीने Asus Zenbook Duo (2024) ची किंमत 1,59,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किमतीत लॅपटॉपचे बेस इंटेल कोअर अल्ट्रा 5 मॉडेल मिळेल. शिवाय, इंटेल कोअर अल्ट्रा 7 हे लॅपटॉपचे एक मॉडेल आहे, ज्याची किंमत 1,99,990 रुपये इतकी असेल. त्याच्या Intel Core Ultra 9 CPU मॉडेलचे दोन प्रकार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 2,19,990 आणि 2,39,990 रुपये आहे. या लॅपटॉप मॉडेल्सची विक्री Amazon आणि Flipkart वर 16 एप्रिलपासून म्हणजेच कालपासून सुरू झाली आहे.

Asus Zenbook Duo (2024) specifications

Asus Zenbook Duo (2024) मध्ये 14-इंचाचे ड्युअल फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आले आहेत. या दोन्ही OLED टचस्क्रीन डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,900×1,200 पिक्सेल आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देखील बघायला मिळते. याशिवाय हा लॅपटॉप इंटेल आर्क ग्राफिक्ससह इंटेल कोर अल्ट्रा 9 पर्यंत प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 32GB LPDDR5x रॅम आणि 2TB SSD स्टोरेज आहे. लॅपटॉप विंडोज 11 होम वर काम करतो.

Asusच्या या लॅपटॉपमध्ये फुल-एचडी AiSense IR कॅमेरा व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग देण्यात आला आहे. यात ॲम्बियंट लाइट सेन्सर देखील मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3, दोन थंडरबोल्ट पोर्ट आणि एक HDMI 2.1 पोर्ट समाविष्ट आहे. ऑडिओसाठी, यात 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे. शिवाय, यूएसबी टाइप-सी पोर्टसह 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. या लॅपटॉपचे डायमेन्शन 31.3 x 21.7 x 1.46 सेमी (कीबोर्डशिवाय) आणि 31.3 x 21.7 x 1.99 सेमी (कीबोर्डसह) आहेत. तर, त्याचे वजन 1.35 किलो इतके आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.