Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंतप्रधानांकडून आपल्या तीन कारकिर्दींचे वर्णन; म्हणाले- आशा, विश्वास अन् हमी…

10

वृत्तसंस्था, नलबारी (आसाम): सन २०१४ मध्ये आपण लोकांमध्ये आशा जागवली, २०१९मध्ये त्यांना आत्मविश्वास दिला आणि २०२४मध्ये हमी दिल्याचे प्रतिपादन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘देशभरात मोदींची गॅरंटी असून, आपण या सर्व ‘गॅरंटीं’ची पूर्तता करणार आहोत,’ असेही ते यावेळी म्हणाले.

येथील बोरकुडा मैदानावर निवडणूक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी तीन मतदारसंघातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आले होते. यात बारपेटा येथील आसाम गण परिषदेचे उमेदवार फणी भूषण चौधरी, कोकराझारमधील लिबरल उमेदवार जयंत बसुमातारी आणि गुवाहाटीमधील भाजप उमेदवार बिजुली कलिता मेधी यांचा समावेश आहे.
कोण आहेत पल्लवी डेम्पो? १ हजार ४०० कोटींची संपत्ती, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट; या मतदारसंघातून भरला अर्ज

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ईशान्य भाग हा मोदींच्या ‘गॅरंटी’चा साक्षीदार आहे, कारण काँग्रेसने या प्रदेशाला फक्त समस्या दिल्या होत्या. पण, भाजपने तेथे संभाव्यतेचे स्रोत निर्माण केले आहेत. काँग्रेसने बंडखोरीला प्रोत्साहन दिले, पण मोदींनी लोकांना सामावून घेत प्रदेशात शांतता प्रस्थापित केली, असेही मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत जे साध्य होऊ शकले नाही, ते मोदींनी दहा वर्षांत मिळवले आहे. अयोध्येतील भव्य मंदिरात सूर्य तिलक सोहळ्याने ५०० वर्षांनंतर भगवान रामाची जयंती साजरी होत आहे आणि हे शतकानुशतकांच्या भक्ती आणि पिढ्यांच्या त्यागामुळे घडले असल्याचे मोदींनी सांगितले.
अखिलेश-डिंपल यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही; दोघांची मिळून संपत्ती आहे इतके कोटी

पुढील पाच वर्षे कोणताही भेदभाव न करता सर्वांना मोफत रेशन दिले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातील.
नाशिक लोकसभा उमेदवारीवरून छगन भुजबळ यांची मोठे वक्तव्य; महायुतींच्या नेत्यांकडे केली ही मागणी

ते म्हणाले, ‘रालोआ सरकार ‘सबका साथ, सबका विकास’वर विश्वास ठेवते आणि प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांचे फायदे मिळतील याची ग्वाही देते.’ तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात आणल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, यामुळे मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही याविरुद्ध कायदा केला. याचा फायदा केवळ मुस्लिम भगिनींनाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला झाला.

भाजपला राम म्हणण्याचा किंवा रामाचा नाव घेण्याचा अधिकार नाही, आडम मास्तर भडकले

‘आसाममध्येही गेल्या दहा वर्षांत अभूतपूर्व विकास झाला आहे आणि जेव्हा लक्ष्य योग्य असते तेव्हा त्याचे परिणामही चांगले असतात. काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जेणेकरून ते भ्रष्टाचार आणि लूटमार करू शकेल,’ असेही मोदी म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.