Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहा हजार भारतीय श्रमिक इस्रायलमध्ये जाणार, कारण काय?

4

वृत्तसंस्था, जेरुसलेम : इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षाच्या उद्रेकानंतर इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात श्रमिकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सुमारे सहा हजारांहून अधिक भारतीय श्रमिक एप्रिल आणि मे महिन्यात इस्रायलमध्ये दाखल होणार आहेत.इस्रायलच्या पंतप्रधानांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि बांधकाम व गृहबांधणी मंत्रालयाने संयुक्तपणे या श्रमिकांना विशेष विमानाने इस्रायलमध्ये आणण्याचा निर्णय एक आठवड्यापूर्वीच घेतल्याचे इस्रायल सरकारने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केले. या निर्णयानंतर भारतीय श्रमिकांना ‘एअर शटल’मार्गे आणले जाईल. इस्रायलमध्ये ज्या क्षेत्रांत श्रमिकांची कमतरता आहे, तेथे भरती करण्याचे काम इस्रायलच्या बांधकाम उद्योगाकडून केले जाते. इतक्या अल्पावधीत इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या परदेशी श्रमिकांची ही सर्वांत मोठी संख्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझातील मदतकार्य ठप्प; सात स्वयंसेवक ठार
इस्रायलमध्ये तब्बल ८० हजार श्रमिकांचा मोठा गट पॅलिस्टाइन नियंत्रित वेस्ट बँक भागातून येतो आणि १७ हजार श्रमिक गाझा पट्टीतून येथे येतात. मात्र ऑक्टोबरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर येथील अनेकांचा कामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
घरातून निघाला तो परतलाच नाही, महिनाभराने बॉडी सापडली, भारतीय विद्यार्थ्यासोबत अमेरिकेत काय घडलं?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून बांधकाम क्षेत्रासाठी अधिकाधिक श्रमिक पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला होता. गेल्या आठवड्यात मंगळवारी याच करारानुसार, बांधकाम क्षेत्रातील सुमारे ६४ श्रमिक भारतातून इस्रायलला पोहोचले होते. पुढील आठवड्यांतही काही श्रमिक इस्रायलमध्ये दाखल होणार आहेत.

इस्रायलहून २१२ भारतीय नागरिकांना घेऊन पहिले विमान दिल्ली विमानतळावर उतरले!

एप्रिलच्या मध्यापर्यंत सुमारे ८५० श्रमिक इस्रायलमध्ये दाखल होतील. गेल्या काही महिन्यांत बांधकाम क्षेत्रातील सुमारे ९००हून अधिक श्रमिक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.