Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुमचे एअर कुलर नीट कुलिंग करत नाही? मग तातडीने बदला ‘हे ५ पार्ट्स’ ज्यामुळे वातावरण होईल थंडगार

25

Cooler Cooling Increase: अनेकदा जूने झाल्यामुळे तुमचं कूलर नीट काम करत नाही. प्रत्येक कुलरमध्ये काही असे पार्ट्स असतात जे वेळोवेळी बदल्यामुळे तुमचे व्यवस्थित कुलिंग करेल. जाणून घ्या हे पार्ट्स कोणते असतात

कुलरची कुलिंग वाढवण्यासाठी वेळोवेळी बदला हे ५ पार्ट्स

कूलिंग पॅड (वाळे): कुलरमधील या कुलिंग पॅड्समुळे हवा थंड होते. काळानुसार हे पॅड्स खराब होतात यामुळे वेळोवेळी हे बदलल्यास तुम्हाला दीर्घकाळापर्यंत कुलिंगचा अनुभव देईल.

पंप: पंप टबमधून पाणी शोषून ते कुलिंग पॅडपर्यंत पोहोचवतो. वापरामुळे जुन्या पंपची क्षमता कमी झाल्यास तो ताबडतोब बदला हा पंप बदलल्यास तुमचे कुलिंग लक्षणीयरित्या सुधारेल

मोटर: कुलरमधील पंखा मोटरमुळे फिरतो. मात्र कालांतराने या मोटरची क्षमता कमी होते व फॅन हळुवार फिरतो व यामुळे कुलरच्या कुलिंगवर मोठा परिणाम होतो.

पंखा: पंखाद्वारे हवा बाहेर फेकली जाते. पण पंख्याचे पाते खराब झाल्यास बाहेर हवा कमी फेकली जाते. नवीन पंख बसवल्यास हवा अधिक चांगल्या पद्धतीने व वेगाने बाहेर पडेल

एअर वेंट: कुलरमुळे थंड झालेल्या हवेला एअर वेंटमधून बाहेर केले जाते. हे खराब असल्यास हवेचा प्रवाह कमी होईल. यामुळे हे वेंट्स वेळीच बदलणे आवश्यक असते.

हे देखिल लक्षात ठेवा
आपल्या कुलरचे कोणतेही पार्ट्स बदलण्याआधी या उपकरणाबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती करुन घेण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिशियनची मदत घेऊ शकतात. तसेच, हे पार्ट्स विकत घेतांना ते अधिकृत कंपनीचे असल्याची खात्री करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.