Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आला ‘बोरिंग फोन’, सोशल मीडियाच्या चक्रव्यूहातून करेल सुटका

16

दिवसेंदिवस लोकांना टेक्नॉलॉजीचा वापर वाढत आहे, इतका की कधी कधी हे व्यसन असल्याचं देखील वाटू लागतं. त्यामुळे अनेकजण यापासून दूर होण्याचे प्रयत्न करत आहेत. यासाठी बाजारात एक नवीन फोन आला आहे जो The Boring Phone नावाने सादर करण्यात आला आहे. ही HMD कंपनी Heineken आणि Bodega च्या कोलॅब्रेशनसह आला आहे. जरी यात स्मार्ट फीचर नसले तरी कनेक्टिव्हिटी मिळेल. चला, जाणून घेऊया याची माहिती.

The Boring Phone

HMD म्हटलं आहे की युजर्स आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करत आहेत. त्यामुळे कंपनीनं हेनेकेन आणि बोदेगासह भागेदारी केली आहे. या दोन्ही कंपन्या खाजगी सोशल लाइफला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे बोरिंग फोन तरुण युजर्सना खूप मदत करेल.

फोनमध्ये ट्रान्सपरंट डिजाइन आणि अनोखा पॅनल मिळतो. तसेच यात फ्लिप पॅटर्न देखील आहे त्यामुळे आहे हटके वाटतो. डिव्हाइसमध्ये युजर्सना जुना कीपॅड मिळेल. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर छोटी स्क्रीन देण्यात आली आहे. थोडक्यात हा फोन तुम्हाला त्या काळात घेऊन जाईल जेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर स्माटफोन अ‍ॅप अस्तित्वात नव्हते. यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल.

The Boring Phone चे स्पेसिफिकेशन्स

बोरिंग फोनच्या स्पेसिफिकेशन मध्ये २.८-इंचाच्या QVGA प्रायमरी डिस्प्ले आणि बाहेरच्या बाजूला १.७७-इंचाच्या डिस्प्लेचा समावेश आहे. मोबाइलमध्ये ०.३एमपीचा कॅमेरा आहे. एचएमडीनुसार डिवाइसची १,४५०एमएएचची बॅटरी २० तासांपर्यंत व्हॉइस कॉलसह एक आठवड्याचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.

डिव्हाइसमध्ये १२८एमबी इंटरनल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून वाढवता येते. फोनमध्ये ४जी कनेक्टिव्हिटी आहे आणि २जी आणि ३जी नेटवर्क सपोर्ट देखील आहे. डिव्हाइसमध्ये अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेला स्नेक गेम, एफएम रेडियो आणि हेडफोन जॅक आहे.

Boring Phone ची उपलब्धता

बोरिंग फोन एक लिमिटेड एडिशन फोन आहे. जो फक्त एचएमडी, हेनेकेन आणि बोदेगाद्वारे आयोजित ऑफलाइन इव्हेंटच्या माध्यमातून उपलब्ध होईल. हा बाजारात विकला जाणार नाही. हेनेकेनच्या वेबसाइटनुसार मोबाइलचे फक्त ५,००० यूनिट्सच बनवण्यात आले आहेत. हा डिव्हाइस युरोप आणि यूएस मध्ये होण्यात काही इव्हेंटमध्ये मिळेल. त्यामुळे भारतात हा येणे शक्य नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.