Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सर्व पेमेंट ॲप पडतील मागे; आता गुगल घेऊन येत आहे ‘वॉलेट’, तुम्हाला मिळतील ‘हे’ अप्रतिम फीचर

12

गुगल पे हे भारतात खूप लोकप्रिय ॲप आहे. लोक सहसा UPI साठी वापरतात. मात्र आता गुगलकडून एक नवीन ॲप लाँच करण्यात येत आहे. या ॲपमध्ये तुम्ही सर्व महत्त्वाची माहिती साठवू शकता. हे अनेक आश्चर्यकारक फीचर देखील देते. हे ॲप अमेरिकेत उपलब्ध असले तरी आता भारतातही ते दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत.

महत्त्वाचे दस्तऐवज साठवण्याची क्षमता

गुगल वॉलेट लवकरच भारतात प्रवेश करू शकते असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या ॲपमध्ये तुम्ही कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज साठवू शकता. यामध्ये क्रेडिट कार्डसह कोणत्याही कागदपत्रांचा समावेश असेल. तुम्हाला Google Pay द्वारे पेमेंट करायचे असल्यास क्रेडिट कार्ड शोधण्याची गरज नाही. कारण त्याची माहिती आधीच वॉलेट ॲपमध्ये साठवली जाईल. त्याच्या मदतीने तुम्ही एखाद्याला पैसे देऊ शकता.

कशी मिळाली भारतातल्या आगमनाची माहिती

वास्तविक, अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा ते वॉलेट ॲप डाउनलोड करण्यासाठी गेले तेव्हा तिथे भारतीय ॲप्सचे सजेशन दिसत होते. यामध्ये SBI पासून भारतीय पेमेंट ॲप्सपर्यंत सर्व काही समाविष्ट होते. मात्र, काही काळानंतर या सजेशनमध्ये पुन्हा एकदा बदल झाला आणि येथे अमेरिकन ॲप्ससाठी सजेशन मिळू लागल्या. हे ॲप आणण्यासाठी गुगलकडून असे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Google Pay आणि Google Wallet जागतिक बाजारपेठेत करतात एकत्र काम

Google Wallet ॲप पेमेंट सेवा प्रोव्हाईड करण्यासाठी 2011 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. मात्र, काही काळानंतर त्यात बदल करण्यात आला. हे ॲप 2 वर्षांपूर्वी पुन्हा लाँच करण्यात आले होते. यामुळेच यामध्ये अनेक अप्रतिम फिचर्स देखील देण्यात आले आहेत. Google Pay आणि Google Wallet जागतिक बाजारपेठेत एकत्र काम करतात. पण आता हे ॲप गुगल इकोसिस्टमचा एक भाग बनले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.