Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमेरिकेत जहाजाच्या धडकेत पूल कोसळला, जहाजावर २२ भारतीय, ६ बेपत्ता नागरिक मृत घोषित

5

वॉशिंग्टन: अमेरिकेतून श्रीलंकेला सामान घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या मालवाहक जहाजाने पुलाला टक्कर मारली आणि बाल्टिमोर शहरातील हा ३ किमीचा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळला. हा पूल कोसळून पटापस्को नदीत बुडाला. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये असं दिसून येतं की जेव्हा पूल कोसळला तेव्हा त्यावर असणाऱ्या अनेक गाड्याही नदीत बुडाल्या. यावेळी अनेकजण या नदीत बुडाल्याची शक्यता होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. यामध्ये दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. अखेर बचाव कार्य थांबवून बेपत्ता ६ जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याचं सीएनएनच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. तर बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ज्या जहाजाने या पुलाला धडक दिली त्याच्या त्या जहाजावरील सर्व २२ जण हे भारतीय होते. बाल्टिमोर पोलिसांनी सांगितलं की, जहाजाने जाणूनबुजून फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा नाही.

बाल्टिमोरचे पोलिस प्रमुख रिचर्ड वॉर्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दहशतवादी हल्ला किंवा जाणूनबुजून हे करण्यात आल्याचे कोणतेही संकेत नाहीत.’ दरम्यान, एफबीआय देखील या पूल दुर्घटनेच्या तपासात सहभागी झाली आहे. नदीत बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी सोनारचा वापर केला जात आहे. याचा वापर सामान्यतः पाणबुडीसाठी केला जातो. नदीत अनेक वाहनेही सापडली आहेत. हे जहाज सिनर्जी मरीन ग्रुपशी संबंधित होते जे २२ लोक चालवत होते. हे सर्व २२ क्रू मेंबर्स भारतीय होते आणि ते जहाज श्रीलंकेला घेऊन जात होते, असे सांगितले जात आहे की. जहाजातील काही क्रू मेंबर्सच्या डोक्याला दुखापत झाली असली तरी कोणालाही गंभीर जखम झालेली नाही.

या घटनेत सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी कंपनीने आपली टीमही पाठवली आहे. या जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता आणि त्याचं नाव दाली होतं. दाली जहाज पुलाच्या एका खांबावर आदळल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, हे जहाज फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या एका खांबावर आदळले, ज्यामुळे पूल कोसळला आणि पाण्यात पडला. यावेळी जहाजालाही आग लागली आणि ते बुडाल्याचं व्हिडिओत दिसून येतं. हा पूल १९७७ मध्ये तयार करण्यात आला होता. पॅटापस्को नदीवर पसरलेला हा पूल एक महत्त्वाचा मार्ग होता. तसेच, तो बाल्टिमोर बंदर तसेच पूर्व किनाऱ्यावरील शिपिंगचा केंद्र होता.

बाल्टिमोर अग्निशमन विभागाच्या केविन कार्टराईट यांनी असोसिएटेड प्रेस या अमेरिकन वृत्तसंस्थेला सांगितले की, ही आपत्कालीन परिस्थिती आहे. सध्या आमचं लक्ष लोकांना वाचवणे आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढणे आहे. पुलावरुन काही सामान लोंबकळत असल्याचं दिसून येत आहे. सात जण नदी असल्याची माहिती होती, त्यांचा शोध सुरु होता. पण, किती नुकसान झालं आहे हे आता सागू शकत नाही. सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री उशीरा १.३० वाजता बाल्टिमोरमधील पुलावर जहाज आदळल्याची माहिती मिळाली. घटनेवेळी पुलावर अनेक वाहनं होती, असंही त्यांनी सांगितलं.

मेयर ब्रँडन एम. स्कॉट आणि बॉल्टिमोर काउंटीचे कार्यकारी अधिकारी जॉनी ओल्स्जवेस्की जूनियर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की आपत्कालीन कर्मचारी बचाव कार्य करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.