Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- अहमदनगर जिल्ह्यात सोमय्या यांच्याविरूद्ध प्रथमच उमटली प्रतिक्रिया.
- किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि आघाडीच्या इतर नेत्यांवरी आरोप थांबवावे- राष्ट्रवादीचे आवाहन.
- आरोप न थांबवल्यास अहमदनगरमध्ये सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करणार- अॅड. शारदाताई लगड
भाजपचे नेते सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच मुश्रीफ समर्थकांकडून विरोध होत आहे. सोमय्या यांनी अहमदनगर जिल्ह्यात येऊनही सरकार आणि त्यातील नेत्यांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सोमय्या यांच्याविरूद्ध प्रथमच प्रतिक्रिया उमटली आहे.
क्लिक करा आणि वाचा- माझ्याकडे आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे, मी थांबणार नाही: किरीट सोमय्या
अॅड. लगड यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी आमचे नेते खासदार शरद पवार व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या,’ असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी केली सही
अॅड. लगड यांनी पुढे म्हटले आहे, ‘तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवून बेछुट आरोप करण थांबवावे, अन्यथा आम्हाला तुमच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल,’ असा इशाराही अॅड. लगड यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसचे घोटाळे बाहेर काढतो म्हणताच अजित पवारांचे दरेकरांना प्रत्युत्तर