Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsAppवर मेसेज पाठवा आणि डाऊनलोड करा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड, कंपनीने सुरु केली नवीन सुविधा

9

WhatsApp आपल्या भारतीय युजर्सला सरकारी कागदपत्र डाउनलोड करण्याची सुविधा देणार आहे. यंत्रणांद्वारे जारी करण्यात आलेल्या मेसेजवर मेसेज केल्यास चॅटबॉटद्वारे युजर्सला या मेसेजिंग प्लेटफॉर्मवर ही कागदपत्रे डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. युजर्सला एका नंबरवर मेसेज करुन स्क्रीनवर दिलेल्या ऑप्शन्सनुसार प्रक्रिया करावी लागेल.

जगभरातील लोकप्रिय असा मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ही सुविधा देईल. यामुळे युजर्सला आवश्यक ठिकाणी सहज ही कागदपत्रे मिळवता येतील. नुकतेच कंपनीने MyGovशी टायअप केले आहे. यासाठी Digilockerची मदत घेतली जाणार आहे. आपल्या खात्यावरून ही माहिती थेट WhatsApp अकाऊंटवर सेंड करण्यात येईल.

MyGov हेल्पडेस्कच्या मदतीने, WhatsApp वापरकर्त्यांना मेसेजिंग ॲपमध्ये डिजीलॉकरमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या चॅटबॉटच्या मदतीने, वापरकर्ते पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, CBSE इयत्ता 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा पॉलिसी – दुचाकी, इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट आणि विमा पॉलिसी यांसारखी कागदपत्रे डाउनलोड करू शकतात. एक गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप युजर्सला यासाठी कोणतेही वेगळे थर्ड-पार्टी ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही.

  • WhatsAppवर ही कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रथम +91 9013151515 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल.
  • +91 9013151515 हा नंबर सेव्ह केल्यानंतर, ॲप उघडा आणि मेसेजमध्ये ‘हॅलो’, ‘हाय’ किंवा ‘डिजिलॉकर’ पाठवता येईल.
  • आता MyGov हेल्पडेस्क वरून उपलब्ध सुविधांची यादी स्क्रीनवर दर्शविली जाईल.
  • चॅट विंडोमध्ये दिलेल्या ऑप्शन्सनुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य सेवेचा निवड करू शकता. तसेच, हे लक्षात ठेवा की, संदेश त्याच नंबरवरून पाठवावा लागेल जो डिजीलॉकर ॲपशी लिंक आहे.

हे देखिल लक्षात ठेवा, WhatsApp वर उपलब्ध असलेल्या MyGov हेल्पडेस्कच्या मदतीने कागदपत्रे डाउनलोड करण्याचा पर्याय फक्त DigiLockerवर अकाऊंट व कागदपत्रे सेव्ह असलेल्या युजर्सला मिळेल. फाईलच्या स्परूपात ही कागदपत्रे चॅटवर पाठवली जाईल, जी डाउनलोड किंवा शेअर केली जाऊ शकतील. डिजीलॉकर सेवा पीसी, अँड्रॉइड आणि iOS वर वेबसाइट आणि ॲपच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्ही अगदी सहजपणे त्याचा वापर करू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.