Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खिशाला परवडणाऱ्या किंमत आला Samsung चा ८जीबी रॅम असलेला नवीन 5G Phone, असे आहेत फीचर्स

38

Samsung नं गेल्या महिन्यात Galaxy F15 5G स्मार्टफोन लाँच केला होता. ज्यात MediaTek Dimensity प्रोसेसर, ६,००० एमएएचची बॅटरी आणि ६जीबी पर्यंत रॅम असे फीचर्स देण्यात आले आहेत. आता या हँडसेटचा आणखी एक वेरिंत कंपनीनं बाजारात आणला आहे. या नव्या मॉडेलमध्ये रॅम वाढवून ८जीबी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत.

Galaxy F15 5G ८जीबी रॅम व्हेरिएंट

या स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. तसेच याचा ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १२,९९९ रुपये तर ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १४,४९९ रुपयांचा आहे. हे मॉडेल बँक ऑफर्स आणि अपग्रेड बोनससह अनुक्रमे ११,९९९ रुपये, १३,४९९ रुपये आणि १४,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येतील. हा हँडसेट Ash Black, Groovy Violet आणि Jazzy Green कलर्स मध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F15 5G चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल HD+ (१,०८० x २,३४० पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड १४ आधारित वनयुआय ५.० वर चालतो. या स्मार्टफोनवर चार वर्ष OS अपग्रेड आणि पाच वर्ष सिक्योरिटी अपडेट दिले जातील. यातील ट्रिपल रियर कॅमेरा युनिटमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६,००० एमएएचची बॅटरी २५ वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ब्लटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्टचा समावेश आहेत. याचा आकार १६०.१ मिमी x ७६.८ मिमी x ८.४ मिमी आणि वजन जवळपास २१७ ग्राम आहे.

Samsung Galaxy M35 आणि Galaxy F35 कधी येणार भारतात

Samsung Galaxy M35 आणि Galaxy F35 स्मार्टफोन्स BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की हे दोन्ही आगामी फोन्स भारतात लवकरच लाँच केले जाऊ शकतात. Samsung Galaxy M35 चा मॉडेल नंबर SM-M356B/DS आणि Galaxy F35 चा मॉडेल नंबर SM-E356B/DS असेल.मॉडेल नंबर मधील DS चा अर्थ असा आहे की फोन्समध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट आहे. BIS लिस्टिंगमध्ये आगामी स्मार्टफोन्सच्या इतर स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.