Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्मार्ट गिझरची किंमत
चीनमध्ये Mijia 60L Dual-Tank Water Heater P1 ची किंमत 2,299 युआन (सुमारे 26,500 रुपये) आहे. गिझरसाठी ही निश्चितपणे प्रीमियम किंमत सीरीज आहे. गीझर प्री-सेल दरम्यान 1,999 युआन (अंदाजे 23,000 रुपये) च्या किमतीत उपलब्ध आहे.
Mijia चे फीचर्स
- Mijia चे नवीन स्मार्ट गीझर अनेक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज आहे.
- गीझर हायपरओएस द्वारे घरी Xiaomi इकोसिस्टमशी कनेक्ट होतो.
- युजर्स ॲपद्वारे गीझरची विविध फंक्शन नियंत्रित करू शकतात, जसे की तापमान, हीटिंग शेड्यूल, पॉवर चालू/बंद किंवा एनर्जी सेव्हिंग मोड इ.
- गीझर केवळ 700 मिमी रुंदीसह आकर्षक डिझाइनसह येतो.
- यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे, जो काही महत्वाची माहिती दर्शवितो.
- Mijia P1 ड्युअल-टँक सेपरेशन आणि 3300W हीटिंग पॉवरने सुसज्ज आहे. हे युजर्सना त्यांच्या गरजेनुसार सिंगल आणि ड्युअल टँकमध्ये स्विच करण्याचा पर्याय देते.
- गिझरची एकूण क्षमता 60L आहे.
- गिझरमध्ये एक विशेष तंत्रज्ञान आहे, जे ते आतून स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्यासाठी कार्य करते.
- याशिवाय, कंपनीचा दावा आहे की, हे तंत्रज्ञान 99.9% अँटीबॅक्टेरियल रेट प्रोव्हाईड करते.
Mijia P1 9-लेयर सेफ्टी सिस्टम
Mijia P1 9-लेयर सेफ्टी सिस्टमसह येते, ज्यामध्ये अँटी-इलेक्ट्रिक वॉल, पॉवर-ऑफ संरक्षण, ड्राय-बर्निंग संरक्षण आणि उच्च तापमान संरक्षण समाविष्ट आहे.