Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या जाहिरातींवर ममता बॅनर्जी यांनी अनेकदा टीका करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हटले की ते प्रत्येक गोष्टीत भगवा रंग घालत आहेत. कोलकाता येथील मेट्रो रेल्वे स्थानकेही भगव्या रंगात रंगवत आहेत असा आरोप केला होता. दूरदर्शन लोगोच्या ताज्या वादात ममता बॅनर्जी यांनी, िनवडणूक आयोगाने यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली,
लोगोचा रंग भगवा करताना दूरदर्शनने, ‘आमची मूल्ये तशीच राहिली व राहतील. आम्ही आता एका नवीन अवतारात आलो आहोत. नवीन रंगातील लोगोसह नवीन बातम्यांचा अनुभव घ्या.’
खासदार सरकार यांनीही निवडणुकीपूर्वी दूरदर्शनच्या लोकांचे ‘भगवेकरण’ पाहून दुःख झाल्याची टीका केली. सरकार यांनी २०१२ ते ते २०१६ पर्यंत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ‘भारताच्या राष्ट्रीय प्रसारकाने त्याच्या ब्रँडिंगसाठी भगवा रंग निवडला, हे पाहणे अयोग्य व क्लेशदायक आहे,’ असे सरकार म्हणाले.
प्रसार भारतीचे सध्याचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी, ‘व्हिज्युअल्सच्या सौंदर्यासाठी’ हे पाऊल आवश्यक असल्याचा बचाव केला. ‘हा रंग भगवा नव्हे तर केशरी’ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. केवळ लोगोच नाही, तर दूरदर्शनने नवीन प्रकाशयोजना आणि आधुनिक उपकरणे यांचा समावेश करून त्याचे स्वरूपही वेगळे केले आहे.
‘सुरुवातीला केशरीच रंग होता’
दूरदर्शन अधिकाऱ्यांनी सांगितले की १९५९ मध्ये जेव्हा दूरदर्शन प्रथम व्यापकरीत्या सुरू झाले तेव्हा त्याचा लोगो केशरी किंवा भगवा रंगाचाच होता. यानंतर निळा, पिवळा आणि लाल असे रंग लोगोत वापरले गेले. मात्र या लोगो डिझाइनच्या मध्यभागी असलेल्या चित्राबरोबर आजगतागायत छेडछाड केलेली नाही. दूरदर्शन लोगोत ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे शब्दही अनेक वर्षांपासून समाविष्ट होते. कालांतराने तेही काढून टाकण्यात आले.