Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अट्टल घरफोड्या गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ताब्यात घेऊन उघड केला गुन्हा..

12


महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा

अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने अटक करुन,६,५४,१००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत……

नागपूर (शहर प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करून त्याच्याकडून ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी – फिरदोस अकील खान (वय ४५ वर्षे), रा.प्लॉट नं.१६, नुरी कॉलनी नुरी मस्जीद जवळ, नारा रोड, नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात अप क्र. २७८/२४ कलम ४५४,४५७ आणि ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे (दि.१६एप्रिल) रोजी २:१५ वा. ते दि.१८एप्रिल च्या ०९:३० वा. दरम्यान ईद सणाकरीता आपल्या परीवारासह ताजबाग येथे आपल्या नातेवाईकाकडे गेले नंतर परत आले असता. मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला दिसला घरात जाऊन पाहीले असता घरातील बेडरूम मधील लोखंडी आलमारीचे लॉक तोडून त्या मधील सोन्या, चांदीचे दागीने व नगदी असा एकुण ८,०१,०००/-रु. चा मुद्देमाल कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस ठाणे जरीपटा, नागपूर शहर येथे अप. क्र. २७८/२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. अन्वये दाखल केला. सदर गुन्हयाचे समांतर तपासात मिळालेल्या गुप्त माहीती वरून आरोपी असलम अब्दुल उर्फ आशु वल्द शरीफ खान (वय २० वर्षे) याला ताब्यात घेऊन त्याचे कडुन १) पिवळया धातुचा हार ३२ ग्रॅम कि.अं.२,२४,०००/- रु. २) पिवळया धातुचे मंगळसुत्र २७.४० ग्रॅम  कि.अं १,९१,८००/- रु. ३) पिवळया धातुचे लॉकेट  ०४.४९ ग्रॅम कि.अं.३१,४३०/-रु. ४) पिवळया धातुची चैन ६ ग्रॅम  कि.अं. ४२,०००/- रु. ५) पिवळया धातुची अंगठी ४.२३ ग्रॅम कि.अं.२९६१०/-रु. ६) पिवळया धातुची अंगठी २.१६ ग्रॅम कि.अं. १५,१२०/-रु. ७) पिवळया धातुचे बाली १.९२ ग्रॅम  कि.अ.१३,४४०/-रु. ८) पिवळया धातुचे टॉप्स २.२७ ग्रॅम.अं. १५,८९०/- रु. ९) पिवळया धातुचे बाली १.२५ ग्रॅम कि..८,७५०/-रु. १०) पिवळया धातुचे लहान लॉकेट ००.६७  कि.अं.४६०/-रु. ११) पिवळया धातूचे टॉप्स जोड ४.३१ ग्रॅम    कि.अं.३०,१७०/-रु. १२) पिवळया धातुचे बेसर एकुन ९ नग २.४८ जुलै १७३६०/-रु. असा एकुण ६,२४,२६०/- रु. माल १३) पांढऱ्या धातुचे दागीने ४९४ कि.अं.२९,६४०/-रु. १४) नगदी ३२००/-रु असा एकुण ६,५७,१००/- रु. चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. वरील नमुद मुद्देमाल व १ आरोपी पुढील तपासकामी पोलिस ठाणे जरीपटका यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील, पोलिस उपआयुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त डॉ.अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण कबाडी, सहायक पोलिस निरीक्षक मयुर चौरसिया, पो.हवा राजेश देशमुख, पोहवा रवि अहिर, पोहवा प्रशांत गभणे, पोहवा श्रीकांत उईके, पोना. प्रविण रोडे, चालक सुधिर पवार, यांनी यशस्वीरित्या केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.