Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर गावात मात्र एका कुटुंबासाठी लग्नाचा अल्बम त्रासदायक ठरला.
- घरात आलेल्या चोरांच्या हाती हा अल्बम लागला आणि त्यांना दागिन्यांचा अंदाज आला.
- फोटोत दिसणारे दागिने काढून द्या म्हणून कुटुंबियांना धमकावले आणि चोरांनी पंधरा तोळे सोने लुटले.
बेलापूर गावात गुरुवारी रात्री दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यातील एका ठिकाणी ही घटना घडली. तर दुसऱ्या ठिकाणी कुटुंबातील समन्वयाअभावी पकडलेला चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. बेलापुरातील गो शाळेजवळ उदय खंडागळे यांच्या घरी रात्री दीडच्या सुमारास चोर आले. त्यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरांच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले. चोरांनी घरातील एका मुलीला पकडून तिच्या गळ्याला चाकू लावला. तिला मारण्याची धमकी देत इतरांनी उचकापाचक सुरू केली. चोरांच्या ताब्यात मुलगी असल्याने कुटुंबियांना शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. उचकापाचक करताना चोरांच्या हाती लग्नातील फोटोंचा अल्बम लागला. चोरांनी त्यातील फोटो पाहिले. त्यात महिलांच्या अंगावर जे दागिने दिसत होते, ते कोठे आहेत, ते काढून द्या, असे म्हणत धमकावण्यास सुरवात केली. कुटुंबीयांना धमकावून सोन्या-चांदीचे दागिने घेऊनच चोरटे तेथून निघून गेले. काही रोख रक्कमही चोरट्यांनी नेली.
क्लिक करा आणि वाचा- ‘हिंदू खतरे में है हा जुमला”; काँग्रेसची भाजपवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
याच गावात दुसरीकडेही चोरीची घटना घडली. भगीरथ चिंतामणी यांच्या घरात दरवाजा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्या घरातून ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरले. मात्र येथे त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. भगीरथ यांचा मुलगा सोमनाथ याने चोरट्यांशी झटापट केली. तेव्हा चोरट्यांनीही त्याला लोखंडी गजाने मारहाण केली. तशाही अवस्थेत सोमनाथ याने एका चोराला पकडले. त्यावेळी तेथे आलेल्या त्याच्या वडीलांना ही नेमकी काय झटापट सुरू आहे, हेच लक्षात आले नाही. आपल्या मुलाला वाचवावे म्हणून त्यांनी त्यालाच घट्ट पकडून खेचून घेतले. त्यामुळे पकडलेला चोर सुटका करून घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी केली सही
त्यानंतर सोमनाथ यानेच पोलिसांना फोन केला. काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी आले. तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. सकाळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, चोरांचा शोध घेण्यात यश आले नाही. चोरटे वाहनातून पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- माझ्याकडे आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे, मी थांबणार नाही: किरीट सोमय्या