Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vodafone Idea (Vi) च्या या प्लॅनची किंमत ९०१ रुपये आहे. हा प्लॅन ७० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनेफिट्सची यादी मोठी आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा प्लॅन युजर्सना १जीबी, २जीबी किंवा २.५जीबी डेटा नव्हे तर रोज ३जीबी डेटाचा अॅक्सेस देतो. इतकेच नव्हे तर कंपनी या प्लॅनसह युजर्सना ४८जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. ७० दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये हा प्लॅन युजर्सना २५८जीबी डेटा वापरण्यास देत आहे.
डेटा व्यतिरिक्त, Vodafone Idea (Vi) चा हा प्लॅन युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील देतो. त्याचबरोबर रोज १०० फ्री एसएमएस देखील पाठवता येतील.
OTT बेनेफिट
विआयचा हा प्लॅन एंटरटेनमेंटच्या दृष्टीने देखील बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी किंवा काही महिन्यांसाठी ओटीटी सब्सक्रिप्शन मिळत नाही तर एक वर्षभराचं सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. या प्लॅनमध्ये कंपनी १ वर्षाचे Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन मोफत देत आहे.
अतिरिक्त बेनेफिट्स
या प्लॅनमध्ये Night Data आणि Weekend Data Rollover च्या सुविधेचा समावेश आहे. नाइट डेट अंतगर्त युजर्स रात्री १२ ते ६ वाजेपर्यंत फ्री अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकतात. हा डेटा त्यांच्या डेली डेटा कोटामधून कट होणार नाही. वीकेंड डेटा रोलओव्हर पाहता, युजर्स सोमवार ते शुक्रवार पर्यंत वाचलेला डेटा शनिवार व रविवारी वापरू शकतात. हा प्लॅन डेटाच्या दृष्टीने विआय युजर्ससाठी खूप आकर्षक ठरणार आहे. जर तुम्ही नवीन सिम खरेदी करू इच्छित असाल तर देखील विआयचा हा प्लॅन तुमच्या नक्की कामी येईल.