Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधार कार्डामुळे होणाऱ्या स्कॅमपासून स्वतःचा बचाव करायचाय? आजच डाऊनलोड करा मास्क्ड आधार कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

11

आधार कार्ड हे प्रत्येकासाठी सर्वात महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. सरकारी किंवा खाजगी कामासाठी भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे असते. म्हणूनच याची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. पण या आधार कार्डचा वापर करून फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. म्हणूनच तुम्ही मास्क्ड आधार कार्ड काढल्यास आशा फसवणुकीच्या प्रकरणांपासून तुमचा बचाव होईल. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही UDAI या वेबसाटईवर जावून तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करू शकतात. जाणून घेऊया प्रक्रिया

भारतातील कुठल्याही नागरिकाचा आयडेंटिटी व्हेरीफिकेशनसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. मात्र सध्या आधार कार्डचा वापर करुन करण्यात येणाऱ्या फसवणुकींमध्ये वाढ होत आहे. यापासून वाचण्यासाठी मास्क्ड आधार उपयुक्त ठरेल. मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्या नेहमीच्या आधार कार्डासारखेच असते, परंतु त्यात आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात. मास्क केलेले आधार कार्ड वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवते, जेणेकरून फसवणूक करणारे तुमच्या संपूर्ण आधार क्रमांकाचा गैरवापर करू शकत नाहीत.

मास्क केलेले आधार कार्ड असे डाऊनलोड करता येईल: तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड थेट डाउनलोड करू शकत नाही. मास्क केलेल्या आधार कार्डसाठी, तुम्हाला प्रथम सामान्य आधार कार्डची PDF डाउनलोड करावी लागेल. डाउनलोड दरम्यान, तुम्हाला मास्क केलेले आधार कार्ड निवडण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

1- मास्क आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी प्रथम https://uidai.gov.in/ वर जा.

2- My Aadhaar विभागात दिलेल्या डाउनलोड आधार पर्यायावर टॅप करा.

3- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सेंड OTP वर क्लिक करा.

4- आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP यात प्रविष्ट करा आणि Verify आणि Download वर क्लिक करा.

5- आता तुम्हाला मास्किंगचा पर्याय दिसेल. येथे, तुम्हाला मास्क केलेले आधार कार्ड हवे असल्यास जवळ दिलेल्या चेकबॉक्सवर टिक करा.

6- डाउनलोड वर क्लिक करा.

7- आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या नावात प्रथम असलेली चार अक्षरे कॅपिटल स्वरूपात व यानंतर तुमचे जन्मवर्ष टाईप करा. हा डाउनलोड केलेल्या PDF फाईलचा पासवर्ड असेल. डाउनलोड फाइलमध्ये तुमची आधार माहिती पीडीएफमध्ये असेल. यामध्ये तुम्हाला आधार कार्डचे फक्त शेवटचे चार अंक दिसतील. ही PDF डिजिटली UIDAI द्वारे स्वाक्षरी केली जाईल आणि पडताळणीसाठी QR कोड दिलेला देखील असेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.