Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
फक्त विराटच नाही तर जगभरातील असे अनेक नामाकिंत खेळाडू आहेत जे या स्क्रीन नसलेल्या फिटनेस बँडचा वापर करतात. याचा वापर टॉप अॅथलीट आपली फिटनेस आणि रिकव्हरी मॉनिटर करण्यासाठी करतात. डिस्प्ले नसून सुद्धा यातील डेटा कसा समजतो तसेच या बँडचे नाव, फीचर्स आणि किंमत चला पाहूया.
WHOOP बँड वापरतो विराट
हा बँड ‘WHOOP’ नावाच्या कंपनीनं लाँच केला होता. हा फिटनेस ट्रॅकर बँड डिस्प्ले नसल्यामुळे इतर सर्व ट्रॅकर बँड पेक्षा वेगळा ठरतो. भारतात मात्र व्हूपनं हा फिटनेस बँड सादर केलेला नाही, त्यामुळे हा जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशातून आयात करावा लागेल. विल अहमद व्हूपचे सीईओ आणि संस्थापक आहेत, ज्याची सुरुवात वर्ष २०१५ मध्ये झाली होती आणि त्यांनी पहिला व्हूप १.० फिटनेस बँड लाँच केला होता. सध्या या बँडचं ५.० व्हर्जन बाजारात उपलब्ध आहे.
WHOOP ट्रॅकर बँडचे फीचर्स
हा एक स्ट्रॅप आहे ज्यात पाच सेन्सर असतात जे डेटा सीरिज मोजतात. ट्रॅकर बँडमध्ये एक बॅटरी देण्यात आली आहे जी ७ दिवसांपर्यंतची पॉवर देते. व्हूप बँड द्वारे ट्रॅक करण्यात येणारा हेल्थ आणि फिटनेस डेटाची अचूकता ९९ टक्के आहे, असा दावा कंपनी करते. हा बँड युजरला रियल टाइम स्ट्रेस स्कोर देखील सांगतो आणि एक रिकव्हरी फोकस्ड ट्रॅकर आहे.
हा खेळाडूंना त्यांच्या शरीरात कोणत्या प्रकारच्या सुधारणेची आवश्यकता आहे हे देखील सांगतो आणि खेळ खेळताना त्यांच्या शरीराची क्षमता किती आहे याचा डेटा देखील देतो. या व्हूप बँडमधील स्लीप कोचच्या मदतीनं खेळाडूच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या झोपेची माहिती देतं.
किंमत
हे स्क्रीन नसलेला फिटनेस ट्रॅकर बँड सब्सक्रिप्शन आधारित आहे. WHOOP हार्ट रेट, बॉडी टेंप्रेचर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लीप ट्रॅकिंग सहज ट्रॅक करू शकतो. हा फिटनेस बँड दर सेकंदाला १०० वेळा डेटा गोळा करतो. या बँडमध्ये डिस्प्ले नाही परंतु हा सहज २४×७ दिवस वापरता येतो.
हा झोप, डेली एनर्जी एक्सपेंस आणि रिकव्हरी ट्रॅक करतो. १२ महिन्यांच्या सब्सक्रिप्शनसह याची किंमत २१५ डॉलर (सुमारे १८ हजार रुपये ) आहे, हा भारतात उपलब्ध नाही. तसेच मंथली सब्सक्रिप्शन शुल्क १८ डॉलर्स (सुमारे १५०० रुपये ) आहे आणि यात WHOOP अॅपचा समावेश आहे, जो सर्व प्लॅटफॉर्म्स (डेस्कटॉप, आयओएस आणि अँड्रॉइड) वर वापरता येतो.