Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चुकून वेबसाइटवर दिसला नोकियासारखा मजबूत फोन; लाँच पूर्वीच किंमत, डिजाइन आणि स्पेसिफिकेशनचा खुलासा

11

नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन सादर करणारी कंपनी HMD Global आता लवकरच HMD-ब्रँडेड स्मार्टफोन सादर करणार आहे. यातील एक Pulse Pro मॉडेल काही दिवसांत बाजारात येणार आहे. कंपनीनं फेब्रुवारी मध्ये ही माहिती दिली होती, तेव्हापासून आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक लीक्स ऑनलाइन दिसले आहेत. अलीकडेच अपकमिंग HMD स्मार्टफोनच्या डिजाइन रेंडर्स लीक झाले होते आणि आता याची रिटेल लिस्टिंग दिसली आहे. फिनलँडच्या रिटेलरनं फोन किंमत आणि मुख्य स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला होता, ज्यामुळे HMD Pulse Pro मध्ये ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला IPS LCD डिस्प्ले मिळेल. लिस्टिंग फोनच्या ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची होती. आगामी फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळेल.

फिनिश ई-रिटेलर Gigantti नं आपल्या वेबसाइटवर HMD Pulse Pro लिस्ट केला होता, ज्यात आगामी फोनची किंमत आणि याचे मुख्य स्पेसिफिकेशन्स देखील होते. लिस्टिंग पेज स्मार्टफोनच्या ६जीबी रॅम आणि १२८जीबी व्हेरिएंटसाठी होती, ज्याची किंमत १७९ यूरो (सुमारे १६,००० रुपये) होती. परंतु, नंतर ही लिस्टिंग डिलीट करण्यात आली.

फोटोजमध्ये फोनची डिजाइन अलीकडेच आलेल्या रेंडर्स प्रमाणे होती, ज्यात फोन नेव्ही ब्लू रंगात होता आणि याच्या बॅक पॅनलवर HMD च्या ब्रँडिंगसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंटला फ्लॅट डिस्प्लेवर एक छोटा होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. तसेच, उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत.

तसेच, प्रमुख स्पेसिफिकेशन्स पाहता, लिस्टिंगनुसार, HMD Pulse Pro मध्ये ६.५६-इंचाचा IPS LCD पॅनल असेल, जो एचडी+ रिजॉल्यूशन आणि ९०हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात UNISOC T606 चिपसेट मिळेल, जो ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून २५६जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळेल, जी यूएसबी टाइप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज करता येईल. चार्जिंग आउटपुटची माहिती अद्याप समोर आली नाही. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा असेल, ज्यात ५०-मेगापिक्सलचा मेन आणि २-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश असेल. तर फ्रंटला ५०-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर मिळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.