Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाळुमाफिया गोलु तिवारी याचे खुनाचा ६ तासात केला उलगडा,सर्व आरोपींना अटक…

12

पुर्ववैमनस्यातुन गोळी झाडून वाळु तस्कराची हत्या,७ आरोपींना ६ तासाचे आत केली अटक.…

गोंदिया (प्रतिनिधी) – शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित वाळु तस्कर गोलु तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहेत. या प्रकरणी फिर्यादी – राहूल हरिप्रसाद तिवारी (वय ३५ वर्षे) व्यवसाय-बिल्डींग सामान विकी रा.गजानन कॉलनी समाधान किराणा दुकानाजवळ, ता.जि.गोंदिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामनगर पोलिस ठाण्यात १२०/२०२४ कलम १२०/२०२४ कलम ३०२,३४ भा.द.वि. सह कलम ३/२५ भा.ह.का सह कलम ३७(१),१३५ म.पो. का १४३, १४४, १४८,१४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी १) राजेंद्र उर्फ बंटी शंकर दावणे (वय ४२ वर्षे), रा.दस खोली, घाट रोड, गोंदिया व्यवसाय ठेकेदारी, २) हिरो शंकर दावणे रा.दस खोली, घाट रोड, गोंदिया व्यवसाय- डेकोरेशन, ३) मोहित दिलीप मराठे (वय ३६ वर्षे), व्यवसाय- सिट कव्हर रा.संजयनगर, संत रविदास चौक, गोविंदपुर, गोंदिया, ४) शिवानंद उर्फ सुजय सदानंद भेलावे (वय १९ वर्षे) यांना अटक केली आहे.

शहरातील रिंगरोड परिसरातील हनुमान नगर येथील रहिवासी वाळु व्यवसायिक गोलु तिवारी यांच्यावर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टीबीटोली परिसरात काही गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, त्यांना शहरातील सहयोग हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गोलू तिवारी यांच्या समर्थकांनी सहयोग रुग्णालयासमोर गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर तिवारी यांच्या समर्थकांकडून हॉस्पिटल मध्ये तोडफोडही करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक, सीसीटीव्ही यासह सर्व प्रकारचे पुरावे गोळा करून मारेकऱ्यांना पकडण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, रामनगरचे पोलिस निरिक्षक संदेश केंजळे व रावणवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांनी तपास पथके तयार करून तपासाची चक्रे गतीशील केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेत विचारपूस  केली असता ५)विनायक रविंद्र नेवारे वय २१ वर्ष रा.गिरोला पोष्ट पांढरबोडी ६)रितेश उर्फ सोंटु संजय खोब्रागडे वय २३ वर्ष रा. कस्तुरबा वार्ड,कचरा मोहल्ला,गोंदिया ७) सतीश सुग्रीव सेन वय २३ वर्ष रा.पन्नागार पोष्ट जबलपुर (मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले पुढील तपास सपोनि बस्तावडे हे करीत  आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी,गोंदिया रोहीनी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामनगर संदेश केंजले,सपोनि माळी,पोहवा सुनील चव्हान,जावेद पठान,बाळा राऊत,छत्रपाल फुलबांधे,पोशि कपील नागपुरे

The post वाळुमाफिया गोलु तिवारी याचे खुनाचा ६ तासात केला उलगडा,सर्व आरोपींना अटक… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.