Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 25 एप्रिल 2024: या राशींसाठी प्रयत्नांती परमेश्वर ! अधिकारासह जबाबदारीत वाढ ! पाहा, तुमचे राशिभविष्य
या राशींना प्रयत्नांतून यश मिळेल. तर या राशीच्या योजना यशस्वी होणार आहेत. मकरसह या राशींची किर्ती आणि संपत्ती वाढणार आहे. चला जाणून घेऊया गुरूवारचे आर्थिक राशीभविष्य
मेष आर्थिक राशिभविष्य : धार्मिक कार्यात रुची वाढेल
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या चांगल्या कामांमुळे तुमच्या कुटुंबाचा गौरव वाढेल. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमेतमुळे तुम्हाला लाभ होईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल. रात्रीच्या वेळी प्रकृती बिघडल्याने फार धावपळ करावी लागेल.
2

मिथुन आर्थिक राशिभविष्य : अडथळे येतील

मिथुन राशीच्या लोकांना आज यश मिळेल. एखादा खटला सुरू असेल किंवा इतर काही चौकशी सुरू असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. त्वरित निर्णय न घेतल्याने अडथळे येतील तसेच नुकसान होईल. नोकरदारांसाठी वरिष्ठांच्या कृपेने अधिकारात वाढ होईल. रात्रीचा वेळ आनंदात जाईल आणि सुखवृद्धी होईल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : प्रयत्नांतून लाभ प्राप्ती

कर्क राशीच्या लोकांना आज भाग्यवृद्धीचा दिवस आहे. जर तुमची पदोन्नती रखडली असेल तर त्यात लाभ होईल. आज तुमच्या प्रयत्नांत लाभ प्राप्ती होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा लाभ होईल आणि धनवृद्धी होईल. अधिक मेहनत घेतल्याने तुम्हाला यशची चव चाखता येईल. प्रकृती बिघडू शकते.
सिंह आर्थिक राशिभविष्य : अधिकारात वाढ होईल

सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे, व्यापाऱ्यांना फार चांगला नफा मिळेल आणि तुमचा दिवस प्रसन्नतेत जाईल. नोकरदार लोकांच्या अधिकारात वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला अर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. कुटुंबाकडून तुम्हाला शुभवार्ता मिळेल. तुम्हाला सामाजिक कार्यातून लाभ होईल आणि तुमची प्रतिमा सुधारेल. तुमच्या मनात अभिमानाची भावना असेल.
कन्या आर्थिक राशिभविष्य : अधिकार आणि जबाबदाऱ्यांत वाढ

कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ राहील. तुमचे अधिकार आणि जबाबदारी यात वाढ होईल. स्वतःच्या प्रतिष्ठेवर पैसे खर्च होतील. तुम्ही इतरांचे भले आणि सेवा फार मन लावून करता, याचा लाभ तुमच्या संततीला होईल. रात्री प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे सतर्क राहा आणि बाहेरचे काही खाऊ नका.
तूळ आर्थिक राशिभविष्य : धोका पत्करू नका

तूळ राशीच्या लोकांनी आज प्रत्येक काम फार विचारपूर्वक करायचे आहे. तुमचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. कामात तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला आज काही दंड होऊ शकतो, त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत लहानसहान त्रास आणि मानहानी होऊ शकते. पैशांच्या व्यवहारात कोणावरही अवलंबून राहू नका.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : योजना यशस्वी होतील

वृश्चिक राशीची कामे आणि योजना यशस्वी होतील. आज तुम्हाला एखाद्या बहुमूल्य वस्तूमुळे लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचे पद आणि अधिकार यात वाढ होईल. तुमचे धाडस आणि पराक्रम यात वाढ होण्याचे योग आहेत. संततीबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत ज्ञानात वृद्धी होईल. नोकरचाकरांचे सुख मिळेल.
धनू आर्थिक राशिभविष्य : विवेकबुद्धीने सर्व कामे कराल

धनू राशीच्या लोकांसाठी सुखात वृद्धी होईल आणि रखडलेल्या योजना पूर्ण होतील. आध्यात्मातून तत्वज्ञानाची प्राप्ती होईल. आज तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने सर्व कामे कराल. अडकलेले पैसे हाती येतील. आकस्मिकरीत्या संततीला काही कष्ट होऊ शकतात. तुमचा विश्वासू व्यक्ती किंवा नोकर तुमचा विश्वासघात करू शकतो, त्यामुळे सावध राहा.
मकर आर्थिक राशिभविष्य : कीर्ती वाढेल

मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुमचा उत्साह वाढेल. काही अनावश्यक खर्च तुमच्या समोर येतील, जे तुम्हाला मनात नसतानाही करावे लागतील. पदोन्नती रखडली असेल तर ती तुम्हाला आज प्राप्त होईल. मोठ्या प्रमाणावर पैसे हाती आल्याने तुम्हाला आनंद होईल. शुभ कार्यात पैसे खर्च झाल्याने कीर्ती वाढेल. वेगवान वाहनांपासून सावध राहा.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : भौतिक सुविधांत वाढ

कुंभ राशीच्या लोकांना आज नशिब साथ हेईल. संयम ठेवावा कारण घाईगबडीत केलेल्या कामांमुळे नुकसान होऊ शकते. भौतिक सुविधांत वाढ होईल आणि तुम्हाला लाभ होईल. नवीन कामात गुंतवणूक करावी लागली तर आवश्य करा, त्याचा भविष्यात लाभ होईल. संततीसाठी नोकरी किंवा विवाहासारख्या कार्यात केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
मीन आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धीचे योग

मीन राशीच्या लोकांना काही प्रकरणात नशिबाची साथ मिळेल, तसेच कामातून, तुमच्या योजनांतून तुम्हाला नफा मिळेल. जर तुम्ही वित्तीतय संस्थांकडून कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला आवश्य मिळेल. नवीन योजना बनवून त्या यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे धाडस आणि पराक्रम यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. धनवृद्धीचे योग आहेत.