Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४ वर्ष न बदलता वापरता येईल ‘या’ फोनची बॅटरी; इतकी आहे Oppo K12 ची किंमत

9

Oppo नं आपल्या होम मार्केटमध्ये एक नवीन स्‍मार्टफोन लाँच केला आहे. याचे नाव Oppo K12 आहे. नवीन ओप्पो स्‍मार्टफोनमध्ये भारतात आलेल्या OnePlus Nord CE 4 5G सारखे स्पेक्स आहेत. फोन १२ जीबी पर्यंत रॅमसह बाजारात आला आहे. यात एक अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेट मिळतो. यातील ५५०० एमएएचची बॅटरी १००वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo K12ची किंमत

Oppo K12 च्या ८जीबी रॅम व २५६जीबी मॉडेलची किंमत १,८९९ युआन (जवळपास २१,८३१ रुपये) आहे. तर याच्या १२जीबी रॅम व २५६जीबी मॉडेल २,०९९ युआन (जवळपास २४,६२१ रुपये) मध्ये येतो. टॉप व्हेरिएंट १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज २,४९९ युआन (२८,७२९ रुपये) मध्ये विकत घेता येईल. फोन क्लियर स्काय आणि स्‍टारी नाइट कलर्समध्ये खरेदी करता येईल.

Oppo K12 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo K12 मध्ये ६.७ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. हा फुल एचडी प्‍लस रिजोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट ऑफर करतो. डिस्‍प्‍लेमध्ये ११०० निट्स पीक ब्राइटनेस मिळते, ज्यामुळे उन्हात देखील फोन सहज दिसतो.

हा फोन ८ आणि १२ जीबी रॅम ऑप्शन्ससह आला आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीनं स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेटचा वापर केला आहे. इंटरनल स्‍टाेरेज ५१२ जीबी पर्यंत आहे. फोनमध्ये कूलिंग सिस्‍टम देखील देण्यात आली आहे, त्यामुळे गेमिंग दरम्यान हा जास्त गरम होत नाही.

Oppo K12 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यात ५० मेगापिक्‍सलचा मुख्य कॅमेरा आहे ज्यात ऑप्टिकल इमेज स्‍टॅबलाइजेशनचा सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर ८ एमपीचा अल्‍ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला १६ मेगापिक्‍सलचा सेन्सर आहे.

Oppo K12 मध्ये ५,५००mAh ची बॅटरी आहे जी १००वॉट सुपरवूक फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची बॅटरी ४ वर्षांपर्यंत टिकेल असा दावा कंपनीनं केला आहे. ओप्पोचा नवीन फोन अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस १४ वर चालतो. यातील आयपी५४ रेटिंग काही प्रमाणात धूळ आणि पाण्यापासून वाचवते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.